हिमंता बिस्व सरमा
हिमंता बिस्व सरमा sakal
देश

सैन्यदलांचा अपमान खपवून घेणार नाही : हिमंता बिस्व सरमा

सकाळ वृत्तसेवा

गुवाहाटी : राहुल गांधी यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी आज अप्रत्यक्षपणे समर्थन केले. तसेच सैन्यदलांबद्दल वेडीवाकडी टिपणी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा दिला.

सर्जिकल स्ट्राईकबद्दल २०१६मध्ये काँग्रेसने केलेल्या टीकेचे ट्विटचे स्क्रीन शॉट सरमा यांनी आज ट्विट केले आणि काँग्रेसवर टीका केली. सरमा यांनी म्हटले आहे, ``आपल्या सशस्त्र दलांबरोबर उभे राहणे चुकीचे आहे का? ``

``देशासाठी सैन्यदलांनी काय केले याबाबत पुरावे मागू नका. भारत ही आपली माता आहे. जवानांबाबत प्रश्न उपस्थित करणे म्हणजे आपल्या आईचा अपमान करण्यासारखे आहे,`` असे सरमा यांना ट्विटमध्ये म्हटले आहे.

जनरल बिपिन रावत यांच्यावर काँग्रेसने केलेल्या टीकेचा समाचारही सरमा यांनी घेतला. ``रावत जेव्हा लष्करप्रमुख झाले, तेव्हापासून काँग्रेसने त्यांच्या क्षमतांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. परंतु, जेव्हा सैनिकांचा अपमान केल्याबद्दल मी त्यांना (काँग्रेस) प्रश्न विचारतो ते नाराज होतात. हा नवा भारत आहे, अशा प्रकारची वागणूक सहन केली जाणार नाही,`` असे सरमा यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT