Jatinga Valley sakal
देश

Jatinga Valley Mystery: आसाममधलं असं रहस्यमयी गाव, जिथे पक्ष्यांचे थवे एकत्र येऊन करतात आत्महत्या

तुम्ही कधी असे ठिकाण पाहिले आहे का जेथे पक्षी आत्महत्या करतात?

Aishwarya Musale

असे अनेक लोक आहेत ज्यांना निसर्गाची आवड असते आणि त्यांना नैसर्गिक सौंदर्याने भरलेल्या ठिकाणी फिरायचे असते. तसेच भारतात असे अनेक ठिकाणे आहेत. बरीच ठिकाणे इतकी रहस्यमय आणि भयानक आहेत की त्या ठिकाणी जायला लोकांचा थरकाप उडतो.

पण आतापर्यंत तुम्ही अशी कोणतीही जागा पाहिली आहे की पक्षी सुसाईड करतात? हे ठिकाण पक्ष्यांच्या आत्महत्येसाठी प्रसिद्ध आहे.

आसाममधील दिमा हसाओ जिल्ह्याच्या खोऱ्यात वसलेले जटिंगा व्हॅली नैसर्गिक परिस्थितीमुळे एका वर्षातील  सुमारे 9 महिने बाहेरील जगापासून विलग होते. बाहेरून हे गाव भारतातील इतर गावांसारखे दिसते. विशेष म्हणजे या गावात शतकानुशतके एक रहस्य दडलेले आहे, ते म्हणजे 'मृत्यूचे रहस्य'.

कोणताही शास्त्रज्ञ, कोणताही संशोधक आणि गावातील वडीलधारी मंडळीही हे गूढ उकलू शकलेले नाहीत. सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात दररोज संध्याकाळी ६ ते रात्री साडेनऊ या वेळेत स्थलांतरित पक्ष्यांचा कळप येथे येतो.

या खोऱ्यात सप्टेंबरनंतर रात्री कर्फ्यूची परिस्थिती आहे. ऑक्टोबर ते नोव्हेंबर या काळात रात्री येथे एक विचित्र परिस्थिती आहे. या ठिकाणी संध्याकाळी ७ ते रात्री दहाच्या दरम्यान पक्षी, किटक आणि पतंग हे बेशुद्ध होऊन खाली पडतात. पक्ष्यांच्या मृतदेहाचे या ठिकाणी खच पडलेले असतात. दृश्य अत्यंत धक्कादायक असते.

आसामच्या बोराईल डोंगरावर जतिंगा हे गाव आहे. या ठिकाणी मुसळधार पाऊस पडतो. जास्त उंचीमुळे आणि पर्वतांनी वेढल्यामुळे ढग आणि धुके आहेत. शास्त्रज्ञ सांगतात की, जोरदार पावसात पक्षी पूर्णपणे ओले झालेले असतात. त्यामुळे जेव्हा ते उड्डाण करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांची क्षमता संपलेली असते.

बांबूची घनदाट व काटेरी जंगले या खोऱ्यात आहेत, यामुळे पक्षी धुके आणि काळोखी रात्री त्यांच्यामुळे काटेरी जंगलातील झाडांना आदळतात आणि अपघातग्रस्त होता. बहुतेक अपघात संध्याकाळी उशीरा घडतात कारण त्यावेळी पक्षी त्यांच्या घरी जात असतात.

तसेच बर्‍याच शास्त्रज्ञांच्या मते, बहुतेक पक्षी कळपात असतात, ज्यामुळे ते एकाच वेळी अपघाताला बळी पडतात. येथे आत्महत्या करणाऱ्यांमध्ये स्थानिक आणि स्थलांतरित पक्ष्यांच्या अनेक प्रजातींचा समावेश आहे. एवढेच नाही तर या खोऱ्यात रात्री प्रवेश करण्यासही बंदी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Pakistan Tensions : ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर आता भारताचा पाकिस्तानला आणखी एक दणका!

Midday Meal Egg Controversy : मध्यान्ह भोजनात अंडे देण्यावरून वाद...एकाच वेळी ७० पालकांनी मुलांना शाळेतून काढलं

VIRAL VIDEO: ए काय करतोयस? सेल्फी घेणाऱ्याला जया बच्चन यांनी दिला जोराचा धक्का; सगळेच अवाक, नेटकरी म्हणतात- त्याला...

Latest Maharashtra News Updates Live: वैद्यनाथ बँकेवर पंकजा मुंडेंचंच वर्चस्व

मृत्यूच्या दाढेतून परत आलेली सचिन यांची एकुलती एक लेक; "डॉक्टरांनी ती टेस्ट सांगितल्यावर मी हादरलो.."

SCROLL FOR NEXT