देश

गरिबांना मिळणार 1 रुपये किलो तांदूळ अन् नववधूला 1 तोळा सोने

वृत्तसंस्था

गुवाहाटी- आसाम सरकारनं पुढच्या वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात अर्थमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी आर्थिक वर्ष 2019-20साठी सादर केलेल्या विधानसभा अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा केल्या आहेत. ज्यात गरिबांना 1 रुपये किलो तांदूळ आणि नववधूला 1 तोळे सोनं मोफत देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

होस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शुल्कातही या अर्थसंकल्पात कपात करण्यात आली आहे. विधवा आणि दिव्यांगांसाठी सामाजिक सुरक्षेच्या योजना आणि अल्पसंख्याक समुदायातील मुलींसाठी उच्च शिक्षण मिळण्यासाठी काही योजनांची घोषणाही करण्यात आली आहे. अर्थसंकल्पात स्वस्त पोषण आहार सहाय्यता योजनेची तरतूद करण्यात आलेली आहे. ज्याअंतर्गत 53 लाख लाभार्थी कुटुंबीयांना खाद्य सुरक्षेंतर्गत तीन रुपयांऐवजी प्रतिकिलो एक रुपयानं तांदूळ मिळणार आहेत. 

चहा बागायत क्षेत्रातील चार लाख कुटुंबांना मोफत तांदूळ पुरविण्यात येणार आहे. तसेच चहा बागायत क्षेत्रातील मजुरांच्या कुटुंबीयांना दोन रुपये किलोनं साखर देण्यात येणार आहे. 45 वर्षांच्या महिलेच्या पतीचं निधन झाल्यास तिच्या कुटुंबीयांना तात्काळ मदतीच्या स्वरूपात 25 हजार रुपये प्रदान करण्यात येणार आहेत. तसेच त्या पत्नीला 60 वर्षांच्या वयोमर्यादेपर्यंत प्रतिमहिना 250 रुपये पेन्शन देण्यात येणार आहे. 60 वर्षांच्या नंतर त्या महिलेला वृद्धावस्थेतील पेन्शनचाही लाभ मिळणार आहे, अशी तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

शिक्षणासाठी सरकार कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेच्या विद्यार्थिनींना मोफत पाठ्यपुस्तकं पुरवणार असल्याचे बिस्वा यांनी सांगितले आहे. सरकारी कॉलेज आणि वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देणार असून, मेस बिलमध्ये 10 महिन्यांपर्यंत प्रत्येक महिन्याला अनुदानाच्या स्वरूपात 700 रुपये दिले जाणार आहेत. अल्पसंख्याक समुदायातील मुलींना उच्च शिक्षण देण्यासाठी 200 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT