ANI
देश

आसाम : काँग्रेसला हादरा, आमदार करणार भाजपात प्रवेश

विश्वास पुरोहित

काँग्रेसमध्ये तरुणांऐवजी ज्येष्ठ नेत्यांना प्राधान्य दिले जाते, असा आरोप करत त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली.

गुवाहाटी - आसाममधील काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आणि विद्यमान आमदार रुपज्योती कुर्मी यांनी गुरुवारी पक्षाला रामराम केला. रुपज्योती लवकरच भाजपात प्रवेश करणार आहेत. काँग्रेसमध्ये तरुणांऐवजी ज्येष्ठ नेत्यांना प्राधान्य दिले जाते, असा आरोप करत त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. कुर्मी यांच्यापाठोपाठ काँग्रेसचे आणखी चार आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त असून काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

रुपज्योती हे रुपम कुर्मी यांचे पुत्र असून ते चार वेळा मरिआनी या मतदारसंघातून विधानसभेत निवडून आले आहेत. दिल्ली आणि गुवाहाटीमधील काँग्रेसचे नेते तरुणांऐवजी ज्येष्ठ नेत्यांना प्राधान्य देतात. यामुळे मी पक्ष सोडत आहे. काँग्रेसने माझ्या मेहनतीची दखल घेतली नाही, असे रुपज्योती यांनी म्हटले आहे. काँग्रेसकडे यंदा आसाममध्ये सत्तास्थापनेची संधी होती. मात्र, (एआययूडीएफ) आघाडी करणे ही एक चूक होती, असा दावाही त्यांनी केला.

दुसरीकडे काँग्रेसने पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवत रुपज्योती यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. आसाममधील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रिपून बोरा यांनी सांगितले की, ‘या निर्णयाला काँग्रेस नेतृत्वाने मंजुरी दिली आहे’. जितिन प्रसाद यांच्यानंतर भाजपात प्रवेश करणारे रुपज्योती हे दुसरे नेते आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : जातपडताळणी समिती सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार काम करते, त्यात सरकारचा हस्तक्षेप नाही; जरांगेंच्या आरोपावर फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं

२२ दिवसांपूर्वी उद्घाटन, एक्सप्रेसवे खचला; पॅचवर्क सुकवण्यासाठी लावले १० पंखे, VIDEO VIRAL

Asaram Bapu Bail Rejected : आसाराम बापूंना सुप्रीम कोर्टाचा झटका; अंतरिम जामीन अर्ज फेटाळला, नेमकं कारण काय?

WhatsApp ग्रुप चॅट्समध्ये मोठे बदल; '@all' टॅगसह आले ३ नवीन धमाकेदार फीचर्स!

Nitin Gadkari: घृणास्पद, आक्षेपार्ह आणि अश्लील कंटेंट; गडकरींची बदनामी करणाऱ्या पोस्ट हटवा, हायकोर्टाचे आदेश

SCROLL FOR NEXT