Assam Flood Latest News 
देश

Assam Flood : आसाममधील पूरस्थिती अजूनही गंभीरच! दहा जिल्ह्यांतील १.१७ लाख नागरिक पुरात अडकले; मृतांची संख्या ३७ वर

Assam Flood Latest News : राज्यातील दहा जिल्ह्यांतील १.१७ लाख नागरिक पुरात अडकल्याची माहिती मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ‘एक्स’वरील पोस्टद्वारे दिली.

सकाळ वृत्तसेवा

गुवाहाटी : आसाममधील पूरस्थितीत किंचित सुधारणा झाली असली तरी ती अजूनही गंभीरच असून राज्यातील दहा जिल्ह्यांतील १.१७ लाख नागरिक पुरात अडकल्याची माहिती मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ‘एक्स’वरील पोस्टद्वारे दिली. या जिल्ह्यांतील २७ महसुली मंडळातील सुमारे ९६८ गावे अजूनही पुराच्या पाण्यात असल्याचेही त्यांनी सांगितले.

करीमनगर जिल्ह्यात बराक खोऱ्यात कुशियारा नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. पुरात अडकलेल्या नागरिकांची संख्या साडेतीन लाखांहून सव्वा लाखांवर आल्याने राज्याला काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, आणखी दोन नागरिकांच्या मृत्यूही नोंदविला गेला. त्यामुळे, चक्रीवादळ, पूर, दरडी कोसळण्याशी संबंधित घटनांतील मृतांची संख्या ३७ वर गेली आहे. राज्यभरात मुसळधार पाऊस, पुराशी संबंधित दुर्घटनांमुळे घरे, रस्ते, बंधारे यांसह अन्य पायाभूत सुविधांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

पुराचा फटका

मदत छावण्या
१३४
आसरा घेतलेले नागरिक
१७,६६१
मदत वितरण केंद्रे
९४
पाण्याखालील जमीन
३,९९५ हेक्टर
परिणाम झालेली प्राणी
२,२०,५४६

इटानगरमध्ये ढगफुटी

अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगरमधील नागरिकांची रविवारची सकाळ ढगफुटीने उजाडली. ढगफुटीमुळे झालेल्या प्रचंड पावसामुळे शहरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४१५ ही जलमय झाला होता. त्यामुळे, इटानगरची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या या महामार्गावर शेकडो वाहने अडकून पडली. ढगफुटीमुळे इटानगरसह परिसरात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या. गेल्या दोन आठवड्यांपासून अरुणाचल प्रदेशात मुसळधार पाऊस होत आहे. मात्र, रविवारी हवामान खात्याकडून मोठ्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला नव्हता.

केंद्रीय गृहमंत्र्यांकडून आढावा

नवी दिल्ली ः मॉन्सूनच्या आगमनाबरोबरच ईशान्येतील आसामसह अन्य राज्यांना पुराचा सामना करावा लागत असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी तयारीचा आढावा घेतला. गेल्या वर्षीही आसाम, बिहारसह अन्य राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे नद्यांची पातळी वाढल्याने पूरस्थिती उद्‌भवली होती. या पार्श्वभूमीवर शहा यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली. देशभरात पूर व्यवस्थापनासाठीच्या सर्वसमावेशक तयारीचा आढावा यात घेण्यात आला. पुराबरोबरच उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, सिक्कीम व अन्य काही राज्यांत दरडी कोसळण्याच्या घटनाही घडतात. अलीकडील काही वर्षांत तमिळनाडू, केरळ आणि जम्मू व काश्मीरमध्येही पूर येण्याच्या घटना घडत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: विरार ते मरीन ड्राइव्ह आता नॉन-स्टॉप! सी लिंक प्रकल्पाला 'पर्यावरण'ची अंतिम मंजुरी

Female Doctor Case: पीएसआय आणि अन्य आरोपीनं महिला डॉक्टरचा छळ का केला? पीडितेच्या भावानं खरं कारणच सांगितलं, वाचा इनसाईड स्टोरी...

23 व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्रीचं गंभीर आजारामुळे निधन; सिनेविश्वावर शोककळा

Mumbai News: रोजंदारी कामगारांची दिवाळी अंधारात! आरोग्य विभागाकडून बोनसचा प्रस्ताव रखडला

Weekly Horoscope 27 October to 2 November: हंस राजयोग कर्क राशीसह 5 राशींचे भाग्य उजळेल, अपूर्ण इच्छा होईल पूर्ण

SCROLL FOR NEXT