hemanta biswa sharma
hemanta biswa sharma file photo
देश

काँग्रेसला सोडचिठ्ठी ते आसाम भाजपचे नवे मुख्यमंत्री

कार्तिक पुजारी

आसामध्ये भाजपला सलग दुसऱ्यांदा विजय मिळालाय. मागील पाच वर्ष आसामची धुरा सर्बानंद सोनोवाल यांच्या हाती होती, त्यांना केंद्रातून राज्यात पाठवण्यात आलं होतं. यावेळी मुख्यमंत्रिपदाची माळ हिमंत बिस्वा शर्मा (himanta biswa sarma) यांच्या गळ्यात पडली आहे.

नवी दिल्ली assam new chief minister- आसामध्ये भाजपला सलग दुसऱ्यांदा विजय मिळालाय. मागील पाच वर्ष आसामची धुरा सर्बानंद सोनोवाल यांच्या हाती होती, त्यांना केंद्रातून राज्यात पाठवण्यात आलं होतं. यावेळी मुख्यमंत्रिपदाची माळ हिमंत बिस्वा शर्मा (himanta biswa sarma) यांच्या गळ्यात पडली आहे. शर्मा यांनी राहुल गांधींच्या नेतृत्त्वाला दोष देत काँग्रेस (congress) सोडून २०१५ मध्ये भाजपप्रवेश केला होता. त्यांनी म्हटलं होती की, मी जेव्हा राहुल गांधींना भेटायला गेलो, तेव्हा त्यांचं लक्ष माझ्यापेक्षा त्यांच्या कुत्र्याकडे अधिक होतं. शर्मा काँग्रेस नेता तरुण गोगाई यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात त्यांच्या जवळचे होते, पण आज त्यांना आसाममधील भाजपचे सर्वात शक्तीशाली नेता मानलं जातं. हिमंत बिस्वा शर्मा यांनी जलुकबाडी मतदारसंघातून सलग पाचवेळा विजय प्राप्त केलाय.

हिमंत बिस्वा शर्मा यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात १९८० मध्ये झाली, जेव्हा ते इयत्ता सहावीमध्ये होते. त्यांनी ऑल आसाम स्टूडेंट्स यूनियन (AASU) जॉईन केली होती. (assam new chief minister himanta biswa sarma congress connection know about him)

२००१ पासून सलग मिळाला आहे विजय

काही वर्षानंतर शर्मा यांना AASU च्या गुवाहाटी यूनिटचा जनरल सेक्रेटरी बनवण्यात आलं. १९९० च्या दशकात काँग्रेसमध्ये गेलेले शर्मा यांनी पहिल्यांदा गुवाहाटीतील जालुकबाडीमधून २००१ मध्ये निवडणूक लढवली. याठिकाणी त्यांनी आसाम गण परिषदेचे नेता भृगु कुमार फुकान यांना हरवलं आणि तेव्हापासून आजपर्यंत त्यांनी या मतदारसंघातून विजय प्राप्त केलाय.

काँग्रेसमध्ये असताना शर्मा यांनी मंत्री म्हणून शिक्षण, आरोग्य आणि कुटुंब कल्याण, कृषि, योजना आणि विकास, पीडब्ल्यूडी आणि अर्थ सारखे महत्त्वपूर्ण विभागांची जबाबदारी संभाळली होती. पण, मुख्यमंत्री तरुण गोगाई यांच्यासोबत झालेल्या वादामुळे त्यांनी २०१६ विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला.

राहुल गांधींच्या कुत्र्यामुळे सोडली होती काँग्रेस

हिमंत बिस्वा शर्मा यांना राहुल गांधींनी कुत्र्याला जास्त महत्व देणं पटलं नव्हतं. शर्मा यांनी स्व:ता ट्विट करुन सांगितलं होतं की, काँग्रेस उपाध्यक्ष (राहुल गांधी) यांच्यासोबत ते महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करु पाहात होते. त्यावेळी राहुल आपल्या पाळीव कुत्र्याला बिस्किट खाऊ घालण्यात व्यस्त होते. शर्मा यांनी सांगितलं होतं की, त्यांनी यासाठी काँग्रेस पक्ष सोडला होता.

पीएचडी आहेत हिमंत बिस्व शर्मा

हिमंत बिस्वा शर्मा यांचा जन्म १ फेब्रुवारी, १९६९ मध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव कैलाश नाथ शर्मा आणि आईचे नाव मृणालिनी देवी आहे. शर्मा यांनी गुवाहाटीतील कामरुप अॅकेडमी स्कूलमधून शिक्षण सुरु केले. त्यानंतर त्यांनी सरकारी लॉ कॉलेजमधून एलएलबी केलं आणि गुवाहाटी यूनिव्हर्सिटीमधून पीएचडी मिळवली. त्यांनी १९९६ ते २००१ दरम्यान गुवाहाटी हायकोर्टात लॉची प्रॅक्टिसही केली आहे. शर्मा यांनी रिकी भुयानसोबत २००१ मध्ये लग्न केलं. त्यांना एक मुलगा आणि मुलगी आहे. २०१७ मध्ये शर्मा बॅटमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajendra Gavit: शिवसेनेचा खासदार भाजपच्या गळाला, देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सकाळी नऊ वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर; महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान

Fact Check: 'गर्दी फक्त पाहायला येते, मतदानाला नाही...' खोट्या दाव्यासह कंगनाचा अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Hybrid Pitch In Dharamshala : हायब्रिड खेळपट्टी म्हणजे काय? धरमशालामध्ये करण्यात आले अनावरण! मुंबईसह 'या' मैदानावर लवकरच होणार प्रयोग

Latest Marathi News Live Update : अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरण; पाचव्या आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT