Bypoll Election 
देश

Bypoll Election Results: देशात विधानसभा पोटनिवडणुकीच्या 13 जागांसाठी मतमोजणी सुरु; काय आहेत सुरुवातीचे कल?

Assembly Bypoll Election Results LIVE 2024 : पश्चिम बंगाल, उत्तराखंड, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, तामिळनाडू, पंजाब आणि बिहार या राज्यामध्ये पोटनिवडणुका झाल्या. आजचे निवडणुकांचे निकाल अनेक अर्थाने महत्त्वाचे आहेत.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- सात राज्यातील १३ विधानसभेच्या पोटनिवडणुकाचे निकाल आज जाहीर होणार आहेत. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरूवात झाली आहे. पश्चिम बंगाल, उत्तराखंड, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, तामिळनाडू, पंजाब आणि बिहार या राज्यामध्ये पोटनिवडणुका झाल्या. आजचे निवडणुकांचे निकाल अनेक अर्थाने महत्त्वाचे आहेत.

१० जुलै रोजी १३ जागांसाठी मतदान पार पडले होते. लोकसभा निवडणुकीनंतर देशातील या पहिल्यात मोठ्या पोटनिवडणुका आहेत. भाजप आणि इंडिया आघाडी यांनी जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी प्रयत्न केला होता. उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीवेळी हिंसा पाहायला मिळाली होती. असे असले तरी निवडणुकीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात मतदान झाले होते.

-पश्चिम बंगालमधील राईगंज, रानाघाड दक्षिण, बागडा आणि मानिकताला, हिमाचल प्रदेशमधील देहरा, हमिरपूर आणि नालगड, उत्तराखंडमधील बद्रिनाथ आणि मंगलौर, पंजाबमधील जालंधर वेस्ट. बिहारमधील रुपाऊली, तमिळनाडूतील विक्रवंदी आणि मध्य प्रदेशातील अमरवारा या विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत.

-हिमाचल प्रदेशमध्ये जुन्या आणि नव्या अशा दोन्ही उमेदवारांचे भविष्य पणाला लागले आहे. सुखविंदर सुख्खू यांच्या पत्नी कमलेश ठाकूर या देहरामधून निवडणूक लढवत आहेत. -

उत्तराखंडमध्ये तिहेरी लढत आहे. बसप, काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांमध्ये चुरशीची लढत आहे.

-पंजाबच्या जालंधरमधील पोटनिवडणूक आप नेते आणि मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासाठी महत्त्वाची मानली जात आहे.

-बिहारमध्ये आरजेडीकडून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी जेडीयूच्या आमदार भीमा भारती यांनी राजीनामा दिला होता. रिक्त असलेल्या रुपाईली मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे.

-तमिळनाडूमध्ये विक्रावंडीमध्ये डीएमकेच्या आमदाराच्या मृत्यूनंतर पोटनिवडणूक होत आहे.

-मध्य प्रदेशमध्ये अमरवारा जागा एसटीसाठी राखीव आहे. याठिकाणी भाजपचे कमलेश शाह आणि काँग्रेसचे धरेन शहा यांच्यामध्ये लढत आहे.

राज्यात काय आहेत सुरुवातीचे कल?

-बिहारच्या रुपाऊली मध्ये जेडीयूचे कलांदर प्रसाद मंडल आघाडीवर आहेत

- हिमाचल प्रदेशच्या हमिरपूरमध्ये काँग्रेसचा उमेदवार आघाडीवर आहे.

-पंजाबच्या जालंधरमधून आपचे उमेदवार मोहिंदर भगत यांनी आघाडी घेतली आहे

- उत्तराखंडमध्ये काँग्रेस दोन्ही जागांवर आघाडीवर आहे

- पश्चिम बंगालमधील चारही जागांवर तृणमूल काँग्रेस आघाडीवर आहे. २०२१ च्या निवडणुकीत यातील तीन जागा भाजपकडे गेल्या होत्या, तर एक जागा तृणमूलकडे होती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT