assembly election cm Vasundhara Raje criticize Gajendrasinh Shekhawat
assembly election cm Vasundhara Raje criticize Gajendrasinh Shekhawat sakal
देश

‘जिन पत्थरों को हमने दी थी धड़कने...’ वसुंधराराजे

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : आगामी विधानसभेसाठी राजस्थानात भाजपला अनुकूल वातावरण दिसत असले तरी पक्षांतर्गत वाद थांबण्याचे नाव घेत नाहीत. माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत व प्रदेशाध्यक्षांवर नाव न घेता प्रखर टीका करणे चालू ठेवले आहे. ज्यांना आपण राजकारणात आणले तेच आज ‘वरून’ पाठबळ मिळताच आपल्या विरोधात गेल्याचे सांगताना वसुंधरा यांनी ‘जिन पत्थरों को हमने दी थी धड़कने, उनको जुबाँ मिली थी तो हम पर ही बरस पड़े’ असा शायराना अंदाज वापरला.

राजस्थानात २०२३ च्या अखेरीस निवडणूक आहे. भाजपची स्थिती चांगली दिसत आहे. मात्र वसुंधरा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा नकोत हा केंद्राचा आग्रह असल्याचे सांगितले जात अाहे. पण राज्य भाजपवर मात्र त्यांचाच प्रभाव कायम असल्याने भाजप कचाट्यात सापडला आहे. गजेंद्रसिंह शेखावत व प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया यांनी वसुंधरा राजेंविरोधात दंड थोपटले असून अन्य एक मंत्री वसुंधरा यांच्याबाबत नरमाईची भूमिका घेताना दिसतात. शेखावत व पुनिया यांनी वसुंधरा राजे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याने राजे गटाच्या ते निशाण्यावर आले आहेत. या दोघांनाही ‘वरून' पाठबळ मिळाल्यानेच ते त्यांच्या एकेकाळच्या नेत्या असलेल्या राजे यांच्याविरूद्ध जाहीर वक्तव्ये करत असल्याचा राजे गटाचा आरोप आहे. वसुंधराराजे याही माघार घेण्याच्या स्थितीत नाहीत.

भैरोसिंह शेखावत यांची आठवण

वसुंधरा राजे यांनी माजी उपराष्ट्रपती भैरोसिंह शेखावत यांची आठवण सांगताना म्हटले की, ज्यांच्यासाठी तू फार काही केलेस तेच वेळ आली की एक दिवस तुला सोडतील, असे ते नेहमी सांगत. ते राजपूत होते व त्याचा त्यांना अभिमानही होता पण जातीयवादी कधीही नव्हते. शेखावत यांचा हात धरूनच आपण राजकारणात आलो त्यांच्यामुळेच दोनदा मुख्यमंत्री झालो. आता माघार घेणार नाही, कारण तसे करणे दिवंगत शेखावत यांच्या मार्गदर्शनाला शोभणारे नसेल, असेही राजे म्हणाल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral: पवार गटाचं काम करणाऱ्याला दत्ता भरणे यांच्याकडून शिवीगाळ? व्हिडिओ रोहित पवारांकडून शेअर

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : महाराष्ट्रात 11 वाजेपर्यंत 18.18 टक्के मतदान; बारामतीमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद

Baramati lok sabha: मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे का पोहचल्या अजित पवारांच्या निवासस्थानी? भेटीमागे नेमकं काय दडलंय?

Latest Marathi News Live Update: 'पन्नू हत्येप्रकरणी भारताच्या तपास अहवालाची वाट पाहतोय': अमेरिका

Lok Sabha 2024: बारामतीत मोठा घोळ! बँकांचं पासबुक ओळखपत्र म्हणून न स्विकारण्याच्या सूचना; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT