देश

गुजरात निवडणुकीची तयारी सुरु; निकालानंतर मोदींचा अहमदाबादमध्ये रोड शो

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी या निवडणुकांच्या निकालानंतर भाजपने लागलीच गुजरात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. काल निकालाच्या विजयोत्सवानंतर लगेचच दोन दिवसांसाठी पंतप्रधान गुजरात दौऱ्यावर आले आहेत. ते पंचायत सदस्यांच्या सभेला संबोधित करणार असून एक रोड शो देखील काढत आहेत. त्यांच्या या रोड शोला सुरुवात झाली आहे. भाजपच्या उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोव्यातील निर्विवाद विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अहमदाबाद, गुजरातमध्ये रोड शो सुरू केला आहे. या ठिकाणी त्यांनी विजयी हात करत जनतसमोर शक्ती प्रदर्शन केलं आहे.

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील यांनी आधीच म्हटलंय की, पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबाद एअरपोर्ट ते पक्षाच्या मुख्य कार्यालयापर्यंत रोड शो करतील. यावेळी चार लाख लोक यामध्ये असतील.

राष्ट्रीय रक्षा युनिव्हर्सिटीच्या दीक्षांत समारंभाला देखील ते उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासोबत गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित असतील. लोकसभेची सेमीफायनल समजल्या जाणाऱ्या या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ते गुजरातमध्ये जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: हिंदू-मुस्लीम ज्या दिवशी करेन, त्या दिवशी...; 'जास्त मुलांच्या' वक्तव्यावर PM मोदींनी दिलं स्पष्टीकरण

Modi Road Show: PM मोदींचा उद्या घाटकोपरमध्ये 'रोड शो'; वाहतुकीत 'असे' असतील बदल

Madhavi Latha: "गुन्हे मेडल्ससारखे," बुरखा प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर माधवी लता आणखी काय काय म्हणाल्या

Artificial intelligence: आपल्याकडे खूपच कमी वेळ उरलाय... एआयवर IMF प्रमुखांनी केली मोठी भविष्यवाणी

IPL 2024: क्वालिफायर अन् फायनल स्टेडियममध्ये जाऊन पाहायचेत? कसे आणि कधी करणार तिकीट बूक, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT