Atik Ahmad Tejaswi Yadav sakal
देश

Atiq Ahmed : अतीकप्रकरणी ‘एसआयटी’ची स्थापना

अतीक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ याच्या खूनप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी तीन सदस्याचा समावेश असलेल्या विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केल्याची माहिती देण्यात आली.

पीटीआय

अतीक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ याच्या खूनप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी तीन सदस्याचा समावेश असलेल्या विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केल्याची माहिती देण्यात आली.

लखनौ - अतीक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ याच्या खूनप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी तीन सदस्याचा समावेश असलेल्या विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केल्याची माहिती पोलिसांच्या वतीने सोमवारी देण्यात आली.

उत्तर प्रदेशचे पोलिस महासंचालक आर. के. विश्‍वकर्मा यांच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनाचा संदर्भ देत, विशेष पोलिस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी, अतीक अहमद आणि अश्रफ याच्या खूनप्रकरणी एसआयटी स्थापन केल्याची माहिती दिली.

या एसआयटीचे नेतृत्व प्रयागराजचे अतिरिक्त पोलिस महासंचालकांकडे असणार आहे. तर प्रयागराजचे पोलिस आयुक्त आणि लखनौच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे संचालक यांचा या एसआयटीमध्ये समावेश करण्यात आला आहे. या एसआयटीच्या देखरेखीखाली या खूनाचा सखोल तपास केला जाणार आहे. तसेच ठराविक कालमर्यादेत तपास पूर्ण करण्याचे देखील उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

अतीक आणि अश्रफ याच्या खूनप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी तिघांना अटक केली असून या कटात सहभागी असलेल्या अन्य दोघांचा शोध सुरू असल्याचे सोमवारी पोलिसांनी सांगितले. या दोघांनी अतीक आणि अश्रफची हत्या करणाऱ्यांची प्रयागराज येथे राहण्याची सोय केल्याचा आणि आरोपींना शस्त्रास्त्रे पुरविल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, याप्रकरणातील तिनही हल्लेखोरांना प्रायगराज येथील तुरुंगातून प्रतापगढ येथील तुरुंगामध्ये हलविण्यात आले आहे.

हा सर्व पूर्वनियोजित कटच - तेजस्वी

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी अतीक आणि अश्रफ यांच्या खुनावरून योगी सरकारवर टीका केली आहे. नितीश म्हणाले की, ‘अपराध्यांना शासन करण्याचे काम न्यायालय करते. परंतु असे कोणत्याही आरोपीला उघडउघड गोळ्या घालणे चुकीचे आहे, मग तो कितीही मोठा अपराधी असो.’’ योगी सरकारवर टीका करताना उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव म्हणाले की, ‘‘ज्या पद्धतीने हा खून झाला त्यावरून हे सर्व पूर्व नियोजित होते हे लक्षात येते. मला कोणत्याही गुन्हेगाराबाबत सहानुभूती मुळीच नाही, पण गुन्हेगारांना शासन करण्यासाठी कायदा आहे. उत्तर प्रदेशात जे काही झाले ती अतीकची नव्हे तर कायद्याची अंत्ययात्रा होती.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Voter List Revision : कोल्हापूर जिल्ह्यातील साडेचार लाख मतदार वगळणार; 'एसआयआर'चे 99.91 टक्के काम पूर्ण, पाहा विधानसभा मतदारसंघनिहाय चित्र

World Record Tiranga Rally: डोंबिवलीत तिरंग्याचा विश्वविक्रमी डौल, ३५ हजार चौरस फुटांच्या ध्वजासह भव्य रॅली

Palkhed Dam Tricolour Lighting: तिरंग्याच्या रंगात न्हाले धरणः स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून मनमोहक तिरंगी विद्युत रोषणाई

Marathi News Live Updates : भोर तालुक्यातील खड्ड्यांमध्ये भात लावून विद्यार्थ्यांनी वेधले प्रशासनाचे लक्ष

Kamalakar Chaskar Police Medal: चास गावच्या सुपूत्राला केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाकडून उल्लेखनीय कामगिरीबद्दल 15 ऑगस्ट रोजी अति उत्कृष्ट सेवा पदक जाहीर

SCROLL FOR NEXT