Aviation sakal
देश

देशांतर्गत विमान उड्डाणे आता ८५ टक्के प्रवाशांसह

लॉकडाऊनमध्ये बंद करण्यात आलेली वाहतूक मे महिन्यात ३३ टक्के क्षमतेसह सुरू करण्यात आली होती.

सुधीर काकडे

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशातील हवाई वाहतूकीवर निर्बंध लावण्यात आले होते. देशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर केंद्र सरकारच्या नागरी उड्डयन मंत्रालयाने शनिवारी हवाई वाहतूकीसाठीची प्रवासी क्षमता ७२ टक्क्यांवरून वाढवून ८५ टक्के केली आहे. लॉकडाऊन दरम्यान देशांतर्गत उड्डाणांवर पूर्ण बंदी घातल्यानंतर २५ मे २०२० रोजी ३३ टक्के क्षमतेसह ऑपरेशन्स सुरू करण्यात आली होती.

प्रवाशांच्या मागणीनुसार अनुसूचित देशांतर्ग वाहतुकीच्या सद्यस्थितीचा आढावा घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारत्या नागरी उड्डयन मंत्रालयाने २१ मे रोजी दिलेल्या आदेशानुसार दिलेल्या अटी, १२ ऑगस्ट २०२१ रोजी शिथील करण्यात आल्या होत्या. आता पुन्हा एकदा नागरी उड्डयन मंत्रालयाने अधिकृत अधिसुचना जाहीर करुन ७२.५ टक्के क्षमता वाढवून ती आता ८५ टक्के करण्यात आली आहे.

गेल्या वर्षी लॉकडाऊन दरम्यान देशांतर्गत उड्डाणांवर पूर्ण बंदी घातल्यानंतर २५ मे २०२० रोजी ३३ टक्के क्षमतेसह ऑपरेशन्स सुरू करण्यात आली होती. मंत्रालयाने विमान कंपन्यांना ३३ टक्के प्रवासी क्षमतेसह वाहतूक करण्याची परवानगी दिली होती. डिसेंबर २०२० पर्यंत हळूहळू ही मर्यादा ८० टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आली. १ जून, २०२१ रोजी पुन्हा एकदा संख्या ५० टक्क्यांवर आणण्यात आली, त्यानंतर ५ जूनला वाढवून ६५ टक्के करण्यात आली. १२ ऑगस्टला दिलेल्या शेवटच्या आदेशानुसार ७२.५ टक्के करण्यात आली होती. त्यानंतर आता प्रवासी क्षमता ८५ टक्के करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT