Ayodhaya Ram Mandir Forty percent of Ram Mandir work is complete pm narendra modi sakal
देश

Ayodhaya Ram Mandir : राममंदिराचे काम चाळीस टक्के पूर्ण

पुढील वर्षी डिसेंबरपासून दर्शन शक्य असल्याची ‘ट्रस्ट’ची माहिती.

सकाळ वृत्तसेवा

अयोध्या : अयोध्येतील राम मंदिराचे गेल्या दोन वर्षांत चाळीस टक्के काम पूर्ण झाले असल्याचे श्रीरामजन्मभूमी ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी आज ‘पीटीआय’शी बोलताना सांगितले. तसेच, डिसेंबर २०२३ पासून जगभरातील भाविक प्रभू श्रीरामाचे दर्शन घ्यायला येतील, असा विश्‍वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दोन वर्षांपूर्वी राममंदिराचे भूमिपूजन झाले होते. त्यानंतर ४० टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे, असे चंपत राय यांनी सांगितले. बांधकाम अत्यंत वेगाने सुरु असून रस्तेही अधिक रुंद केले जात आहेत.

चंपत राय हे अयोध्येतच राहून कामावर देखरेख ठेवत आहेत. विश्‍वस्त मंडळाच्या सभासदांनी दिलेल्या माहितीनुसार, हे मंदित हजारो वर्षे टिकावे यासाठी प्रचंड मोठा पाया बांधण्यात आला आहे. मंदिरासाठी निधी कोठून येतो, असे विचारले असता राय यांनी,‘देवाच्या कार्यासाठी पैशांची कमतरता नाही. लक्ष्मी देवाच्या चरणांपाशीच बसलेली आहे,’ असे उत्तर दिले.

सर्वसाधारण रचना

  • आठ एकर परिसरात बांधकाम

  • पूर्व दिशेला प्रवेशद्वार

  • सीता, गणपती, वाल्मिकी, केवट, शबरी, जटायू आणि शेषावतार लक्ष्मण यांचीही मंदिरे परिसरात बांधणार

  • राजस्थानातील मकराना येथून संगमरवराचा गर्भगृह बांधण्यासाठी वापर

  • संगमरवर योग्य आकारात कापण्याचे काम रात्रंदिवस सुरु

  • राममंदिर ते हनुमानगढी हा मार्ग विस्तीर्ण करणार, यासाठी अनेक दुकाने आणि घरांचे पाडकाम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO News: नोकरी बदलणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी EPFO चा महत्त्वपूर्ण निर्णय; कुटुंबियांनाही फायदा होणार, नवीन नियम काय?

PM Modi: ओमानमध्ये मोदींचं स्वागत बघून मुस्लिम जग हादरलं! पाकिस्तानी एक्सपर्टचा संताप, ''भारताकडे एवढं लक्ष...''

Mumbai News: मुंबईतील उपकरप्राप्त इमारतींचा पुनर्विकास होणार, ५१ टक्के भाडेकरूंची संमती पुरेशी; उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती

Kolhapur Election : वीस प्रभागांतून तब्बल ३२९ इच्छुक; काँग्रेससमोर उमेदवार निवडीचे मोठे आव्हान

Viral Video : 'हा' व्हिडिओ पाहून चीड येईल! भररस्त्यात जावयाचे सासूसमोर लोटांगण, तरीही पत्नी मिळालीच नाही, नेमका काय प्रकार?

SCROLL FOR NEXT