Ram Mandir 
देश

Ayodhya Ram Mandir: ठरलं! 'या' तारखेपर्यंत भाविकांना करता येणार श्रीरामची पुजाअर्चा; मंदिर समितीची घोषणा

अयोध्येतील राम मंदिर निर्माणाचं काम प्रगतीपथावर असून याच वर्षी ते भाविकांसाठी खुलं होणार आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिर निर्माणाचं काम प्रगतीपथावर असून याच वर्षी ते भाविकांसाठी खुलं होणार आहे. याबाबत सविस्तर माहिती राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी दिली आहे. कुठल्या तारखेपासून भाविकांना प्रत्यक्ष मंदिरात जाऊन भगवान श्रीरामाची पुजाअर्चा करता येईल याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

नृपेंद्र मिश्रा यांनी सांगितलं की, मंदिर ट्रस्टनं निर्णय घेतला आहे की, राम मंदिर निर्मितीचा पहिला टप्पा २० डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर पहिला आणि दुसरा मजला ३० डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. पण आम्ही प्रयत्न करतोय की, ३० डिसेंबर २०२३ पर्यंत श्रीरामाची पुजाअर्चा करता येईल.

दोन्ही टप्प्यांमध्ये कुठलं काम होईल?

पहिल्या टप्प्यात तळमजल्यावरचा जे पाच मंडप आहेत, यातील सर्व प्रमुख तर गर्भगृह आहे, जिथं भगवान श्रीरामाची मुर्तीची प्रतिष्ठापना होईल. त्यानंतर गुरु मंडप आहे, प्रार्थना मंडप आहे, नृत्य मंडप आहे. या पाचही मंडपांमध्ये १६० स्तंभ आहेत. त्यामध्ये नक्षीकाम आहे. तसेच लोअर प्लिन्थमध्ये श्रीरामाच्या जीवनातील प्रसंग दाखवले जाणार आहेत. तसेच वीजेची आणि इतर व्यवस्था यामध्ये असतील.

त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात पहिला मजला आणि दुसरा मजला यासाठी तसेच परिक्रमेचं स्थान आहे. यासाठी ३० डिसेंबर २०२४ पर्यंत सुरु होणं अपेक्षित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT