Ayodhya Surya Tilak eSakal
देश

Ayodhya Surya Tilak : अन् सूर्यदेवाने दिला रामलल्लांना आशीर्वाद, असा पार पडला अयोध्येतील 'सूर्य-तिलक' सोहळा; पाहा व्हिडिओ

Ram Navami 2024 : रामनवमीनिमित्त आज संपूर्ण देशभरात उत्साह आहे. अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या उद्घाटनानंतरची ही पहिलीच रामनवमी आहे.

Sudesh

Ayodhya Ram Mandir Suryabhishek : रामनवमीनिमित्त आज संपूर्ण देशभरात उत्साह आहे. अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या उद्घाटनानंतरची ही पहिलीच रामनवमी आहे. यानिमित्ताने याठिकाणी सूर्य-तिलक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. आज दुपारी १२ वाजता सूर्याच्या किरणांनी रामलल्लांना तिलक लावला. सुमारे 4 मिनिटे सूर्याची किरणं मूर्तीच्या डोक्यावर पडत होती. अशा प्रकारे रामलल्लांचा सूर्याभिषेक सोहळा पार पडला.

पौराणिक कथांंनुसार, जेव्हा प्रभू श्रीरामांचा जन्म झाला होता; तेव्हा सूर्यदेवाने येऊन त्यांना आशीर्वाद दिला होता. याच प्रसंगाची पुनरावृत्ती करण्यासाठी अयोध्येतील राम मंदिरात विशेष तयारी करण्यात आली होती. आज दुपारी 12 वाजता, एका खास तंत्राच्या मदतीने सूर्याची किरणे रामलल्लांच्या मूर्तीवर प्रक्षेपित करण्यात आली. रामलल्लांच्या कपाळावर या मदतीने सूर्यकिरणांचा तिलक लावण्यात आला.

अध्यात्माला विज्ञानाची जोड

अयोध्येतील राम मंदिर हे तीन मजली उंच आहे. यातील तळमजल्यावर असणाऱ्या गर्भगृहात रामलल्ला विराजमान आहेत. त्यामुळे याठिकाणी सूर्य किरणे पोहोचवणं हे एक चॅलेंज होतं. यासाठी CSIR-CBRI रुडकी आणि बंगळुरूतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅस्ट्रोफिजिक्सच्या मदतीने नवीन तंत्रज्ञान विकसित केलं गेलं.

यामध्ये तीन आरसे आणि एका लेन्सच्या मदतीने एक सेटअप तयार करण्यात आला. आरशांच्या मदतीने मंदिरावर पडणारी सूर्याची किरणं ही आतल्या बाजूला वळवण्यात आली. गर्भगृहापर्यंत नेलेल्या सूर्यकिरणांना लेन्सच्या मदतीने रामलल्लांच्या कपाळावर फोकस करण्यात आले. यामुळे रामलल्लांना 'सूर्य-तिलक' लावणं शक्य झालं, आणि हा सूर्याभिषेक संपन्न झाला. यासाठी तयार करण्यात आलेल्या सेटअपमध्ये अत्यंत उच्च प्रतीचे आरसे आणि लेन्स वापरल्या आहेत. त्यामुळे पुढील कित्येक वर्षे हा सोहळा पार पाडता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Marathi News Live Updates : मध्य प्रदेशातील सांवर येथे भिंत कोसळून चार महिलांचा मृत्यू, पाच जण जखमी

Otur News : जुन्नर तालुक्यात प्रस्तावित कल्याण–लातूर जनकल्याण महामार्गाला तीव्र विरोध; शेतकरी आक्रमक, धरणे आंदोलनाला सुरुवात

SCROLL FOR NEXT