Ram Mandir Ayodhya Ram Mandir Ayodhya
देश

Ram Mandir Ayodhya : राम मंदिराच्या पहिल्या मजल्याचं काम जवळपास पूर्ण; समोर आले नवीन फोटो

राम मंदिराचं काम वेगाने होत असल्याचं या फोटोंमधून दिसून येतंय.

Sudesh

अयोध्येमध्ये उभारलं जात असणाऱ्या राम मंदिराचे चार नवीन फोटो समोर आले आहेत. मंदिराचं काम वेगाने होत असल्याचं या फोटोंमधून दिसून येतंय. मंदिराच्या पहिल्या काम पूर्ण होत आलं आहे. २०२० साली पंतप्रधान मोदींच्या हस्ते या मंदिराच्या जागेचं भूमिपूजन करण्यात आलं होतं. आता हे मंदिर आकार घेतंय.

जानेवारीमध्ये होणार प्रतिष्ठापणा

राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२४ च्या १५ ते २४ जानेवारीदरम्यान मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा होईल. मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर ही प्रतिष्ठापणा करण्याचं उद्दिष्ट आहे. पाच वर्षांच्या बालकाच्या रुपातील श्रीरामांची मूर्ती मंदिरात स्थापन करण्यात येणार आहे.

Ram Mandir Latest Pic

यावर्षीच्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत मंदिराच्या पहिल्या मजल्याचं काम पूर्ण होईल. त्यानंतर डिसेंबर अखेरपर्यंत फिनिशिंग टच देण्यात येईल. ग्राऊंड फ्लोअरवर भगवान श्रीरामांचं संपूर्ण कुटुंब असणार आहे. तर, दुसऱ्या मजल्यावर कोणतीही मूर्ती नसणार आहे, असं चंपत राय यांनी स्पष्ट केलं.

मंदिराचे गर्भगृह अशा प्रकारे बांधण्यात आलं आहे, की पहिल्या चैत्र राम नवमीला सूर्याची किरणं थेट प्रभू श्रीरामांच्या मूर्तीवर पडतील. तसेच, एका वेळी ४०० लोक श्रीरामांचं दर्शन घेऊ शकतील.

Ram Mandir Latest Pic

खांबांमध्ये कोरणार मूर्ती

राम मंदिराच्या समोर पाच मंडपांच्या १६० खांबांवर मूर्ती कोरण्याचं काम सुरू आहे. हे खांब पिंक सँडस्टोनचे आहेत. तर, गर्भगृहामध्ये सहा पांढऱ्या संगमरवराचे खांब उभारण्यात येणार आहेत. प्रत्येक खांबावर तीन भाग असणार आहेत. याच्या वरच्या भागात ८ ते १२ मूर्ती, मधल्या भागात ४ ते ८ मूर्ती आणि खालच्या भागात ४ ते ६ मूर्ती असणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kokilaben Ambani Hospitalised : कोकिळाबेन अंबानी यांची अचानक तब्येत बिघडली, एच एन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये दाखल

Maharashtra Latest News Live Update : गोदावरी नदीची पाणी पातळी पूर्वपदावर

Solapur Bailpola:'अकोलेकाटीत वीस वर्षांपूर्वी प्रत्येकाच्या दारात होती बैलजोडी'; आज बोटावर मोजण्याइतक्याच; ट्रॅक्टरने बळकावली बैलांची जागा

South America Earthquake : भूकंपाच्या धक्क्याने दक्षिण अमेरिका हादरली ! 8.0 इतकी तीव्रता, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Nations Cup 2025: नेशन्स करंडक स्पर्धेसाठी भारतीय फुटबॉल संघाचे शिबिर सुरू; सहा दिवसांनंतरही ३५ पैकी २५ खेळाडूंचीच उपस्थिती

SCROLL FOR NEXT