Ayodhya Ram Mandir Esakal
देश

Ayodhya Ram Mandir: रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेची आतुरता वाढली, चौथ्या दिवशी होणार 'हे' विशेष विधी

Ayodhya Ram Mandir: 22 जानेवारीला रामलल्लाच्या अभिषेकपूर्वी अयोध्येत सुरू असलेल्या 6 दिवसीय धार्मिक विधींचा आज चौथा दिवस आहे. आज अनेक विशेष पूजा आणि विधी केले जातील.

अंकिता खाणे (Ankita Khane)

अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या उद्घाटनाला अवघे ३ दिवस बाकी आहेत. चौथ्या दिवशी रामलल्लाची मंदिरात प्राणप्रतिष्ठापणा केली जाईल. संपूर्ण जग या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याची वाट पाहत आहे. रामलल्लाच्या भव्य दिव्य स्वागतासाठी अयोध्येला सजवण्यात आले आहे. 22 जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिर उद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख यजमान पंतप्रधान नरेंद्र मोदी असणार आहेत.

या सोहळ्यासाठी सुमारे 6 हजार पाहुणे अयोध्येत उपस्थित राहणार आहेत. अयोध्येत होणाऱ्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्यापूर्वी 16 जानेवारीपासून 6 दिवसांचा कार्यक्रम सुरू झाला होता, आज या कार्यक्रमाचा चौथा दिवस आहे.

अयोध्येत आज कोणते कार्यक्रम आहेत?

अयोध्येतील आजच्या चौथ्या दिवसाच्या कार्यक्रमादरम्यान, पवित्र अग्नि प्रज्वलित केला जाईल, त्यानंतर 'नवग्रह' आणि 'हवन' (अग्नीभोवती पवित्र विधी) केले जाईल. 20 जानेवारी रोजी रामजन्मभूमी मंदिराच्या गर्भगृहाला सरयूच्या पाण्याने स्नान घातले जाईल, त्यानंतर वास्तुशांती आणि अन्नाधिवास विधी होईल. राम मंदिर अभिषेक सोहळ्याला 16 जानेवारीला सुरुवात झाली. मंदिर ट्रस्टने नियुक्त केलेल्या यजमान श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र यांनी सोहळ्याचे संचालन केले. सरयू नदीच्या तीरावर दशविद स्नान, विष्णूपूजा आणि गाईचा नैवेद्य करण्यात आला.

अयोध्येत चौथ्या दिवशी होणार विशेष विधी

कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 17 जानेवारीला रामलल्लाच्या मूर्तीची मिरवणूक अयोध्येला पोहोचली. मंगल कलशातील सरयू जल घेऊन भाविक रामजन्मभूमी मंदिरात पोहोचले होते. कार्यक्रमाच्या तिसर्‍या दिवशी म्हणजे १८ जानेवारीला गणेश अंबिका पूजन, वरुण पूजा, मातृका पूजा, ब्राह्मण वरण आणि वास्तू पूजनाने विधीवत सुरुवात झाली. आजचा दिवस म्हणजे १९ जानेवारी हा दिवसही अयोध्येसाठी खास आहे.आज अयोध्येत होणाऱ्या विधींमध्ये अग्नी स्थापना, नवग्रह स्थापना आणि हवन यांचा समावेश आहे.

गर्भगृहात विराजमान प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्तीचा पहिला फोटो आला समोर

राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी रामलल्लाच्या मूर्तीची पहिली झलक समोर आली आहे. गुरुवारी रात्री रामलल्लाच्या मूर्तीचे पहिले दर्शन घडले. रामलल्लाची मूर्ती गर्भगृहात ठेवण्यात आली. तत्पूर्वी क्रेनच्या साहाय्याने रामलल्लाची मूर्ती मंदिर परिसरात पोहोचली. अयोध्येत विराजमान होणाऱ्या प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्तीचा पहिला फोटो प्रसिद्ध करण्यात आला आहे. गर्भगृहातील या फोटोमध्ये मंदिराचे बांधकाम करणारे कामगार हात जोडून उभे असल्याचे दिसत आहे. प्रभू श्रीरामचंद्रांची ही मूर्ती म्हैसूर येथील शिल्पकार अरुण योगीराज यांनी घडवली आहे. या मूर्तीची उंची ५१ इंच इतकी आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, मूर्तीला आसनावर स्थापन करण्यासाठी तब्बल चार तासांचा वेळ लागला. मंत्रउच्चार विधी आणि पूजा केल्यानंतर मूर्ती आसनावर विराजमान झाली. यावेळी मूर्तीकार आणि अनेक भाविक देखील उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: संसदेच्या बाहेर लोक गोळा करायचे अन् बालिश चाळे...; शिंदे खासदाराची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका

IND vs ENG 5th Test: ८ वर्षांनी संधी मिळाली, पण Karun Nair ने माती केली! कसोटी कारकीर्द संपल्यात जमा, कारण...

Latest Maharashtra News Updates Live: रेल्वे कर्मचाऱ्यांवर हल्ला

Badlapur Accident: बदलापुरात भीषण अपघात! ट्रकचे नियंत्रण सुटले, अनेक गाड्यांना धडक; एकाचा मृत्यू, ७ जण जखमी

Pali News : सरसगड किल्ल्यावरून पडून तरुण गंभीर जखमी; डोक्याला इजा, खांदा फॅक्चर

SCROLL FOR NEXT