Shriram Sakal
देश

अयोध्येतील रामलल्लाला प्रथमच सोन्याचा मुकुट

कोरोना संसर्गामुळे अयोध्येतील रामजन्मोत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला. मात्र, यंदाच्या उत्सवात तात्पुरत्या मंदिरात विराजमान असलेल्या रामलल्लाला प्रथमच सोन्याचा मुकुट घालण्यात आला.

शरत प्रधान

अयोध्या - कोरोना संसर्गामुळे अयोध्येतील रामजन्मोत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला. मात्र, यंदाच्या उत्सवात तात्पुरत्या मंदिरात विराजमान असलेल्या रामलल्लाला प्रथमच सोन्याचा मुकुट घालण्यात आला. हा मुकुट आजच्या उत्सवासाठीच एका अज्ञात भक्ताने समर्पित केला होता.

अयोध्येतील प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्तीला पाचशे वर्षांत प्रथमच सोन्याचा मुकुट घालण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. १९९२ पासून रामलल्लाच्या मूर्तीसाठी चांदीचा मुकुट वापरला जात होता. आता रामलल्लासह इतर तिघा भावांच्या मूर्तींनाही शुद्ध सोन्याचा मुकुट घालण्यात आला आहे. या मुकुटांची किंमत ११ लाख रुपये असल्याचे सांगितले जाते. रामलल्ला मंदिराचे मुख्य पुजारी सतेंद्र दास यांच्या ताब्यात हे मुकुट काही दिवसांपूर्वीच आले होते. आज श्रीरामासह इतर मूर्तींना नवे वस्त्र परिधान करून हे मुकुट घालण्यात आले. दरवर्षी अनेक प्रतिष्ठीत नेत्यांच्या आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत होणारा रामजन्मोत्सव यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने निवडक लोकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. मात्र, रामलल्लाला शरयू नदीच्या पाण्याने आंघोळ घालून नंतर सर्व नेहमीची विधीवत पूजा पार पाडली गेली, असे पुजाऱ्यांनी सांगितले. प्रभूला विविध पक्वानांचा भोगही चढविण्यात आला. हा प्रसाद नंतर शहरातील नागरिकांना घरपोच पोहोचविला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indra Nooyi India Remarks : भारत घाण देश, तिथे असते तर पेप्सिकोची सीईओ कधीच झाले नसते... इंद्रा नूयी यांनी गायले चीनचे गोडवे

Kolhapur News : आबाजीच गोकुळचे ‘बाप’, अरुण डोंगळेंच्या विधानाने नव्या वादाला तोंड; दूध उत्पादक सभासदांना कमी लेखण्याचा प्रकार

Croatia vs Portugal : ख्रिस्तियानो रोनाल्डो स्वप्नपूर्तीच्या दिशेने एक पाऊल पुढे जाणार की स्वप्नांचा चुराडा होणार? दोन दिग्गजांची कसोटी

Shadu Idols : शाडूच्या मूर्तीबाबत अडचण काय? POP वर सरसकट बंदी नको, राज्य सरकारचा विरोध; शाडूच्या मूर्तीला अडचण काय? हायकोर्टाची विचारणा

Navi Mumbai News : नवी मुंबईत गर्भवतीचा उपचारादरम्यान मृत्यू, दुसरी गंभीर; चौकशी समिती नियुक्त

SCROLL FOR NEXT