देश

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपनेते बाबूलाल गौर यांचे निधन

वृत्तसंस्था

भोपाळ : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते बाबूलाल गौर (वय 89) यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्‍याने नर्मदा रुग्णालयात निधन झाले. सायंकाळी सुभाषनगर विश्रामघाट येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी भाजप कार्यालयात ठेवण्यात आले होते. 

गेल्या चौदा दिवसांपासून ते नर्मदा रुग्णालयात व्हेंटिलेटरवर होते. बाबूलाल गौर यांची मंगळवारी तब्येत अचानक बिघडली. त्यांचा रक्तदाब कमी होण्याबरोबरच ठोकेही कमी पडू लागले होते. त्यांचे मूत्रपिंड योग्यरीतीने काम करत नव्हते.

बाबूलाल गौर हे 23 ऑगस्ट 2004 ते 29 नोव्हेंबर 2005 पर्यंत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशच्या प्रतापगडच्या नौगीर येथे 2 जून 1930 रोजी झाला होता. ते 1946 पासून आरएसएसशी निगडीत होते. ते भारतीय मजदूर संघाचे संस्थापक सदस्य होते. ते गोंविदपुरा या पारंपरिक विधानसभा मतदारसंघातून दहा वेळेस प्रतिनिधित्व केले. बाबूलाल गौर यांच्या निधनाबद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष राकेश सिंह यांनी शोक व्यक्त केला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 02 मे 2024

IPL 2024, CSK vs PBKS: पंजाब किंग्सने करून दाखवलं, चेन्नईला सलग पाचव्यांदा हरवलं

ग्रीन नोबेलचा मानकरी

Latest Marathi News Live Update : काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी राहुल गांधी आज कर्नाटक दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT