Tarun Saxena, a dedicated employee, tragically succumbed to work-related stress, highlighting the urgent need for reforms in workplace culture. esakal
देश

"45 दिवस झोप नाही, जेवणही नाही...", लोन विभागातील कर्मचाऱ्यानं कामाच्या दबावामुळे संपवलं जीवन, आई-वडिलांना शेवटचं पत्र

Employee Heartbreaking Note Raises Awareness: तरुणच्या आत्महत्येनंतर कामाच्या ताणामुळे होणाऱ्या मानसिक तणावाचे गंभीर परिणाम अधोरेखित झाले आहेत. कंपनीतील कार्यसंस्कृतीत बदल करण्याची मागणी होते आहे.

Sandip Kapde

उत्तर प्रदेशातील झांसी येथे एका 42 वर्षीय कर्ज वसुली क्षेत्रातील व्यवस्थापकाने कामाच्या तीव्र तणावामुळे जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. तरुण सक्सेना असे या कर्मचाऱ्याचे नाव असून, तो बजाज फायनान्स कंपनीत क्षेत्रीय व्यवस्थापक म्हणून कार्यरत होता. त्याच्या पत्रात स्पष्टपणे नमूद केले आहे की, गेल्या दोन महिन्यांपासून वरिष्ठांकडून त्याच्यावर कामाचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी प्रचंड दबाव आणला जात होता, तसेच पगार कपातीची धमकी दिली जात होती.

कामाच्या तणावामुळे निर्णय-

तरुण सक्सेना याने टोकाचा निर्णय घेण्याआधी पाच पानांचे एक पत्र लिहिले होते, ज्यामध्ये त्याने कामाच्या अतोनात तणावामुळे आपले जीवन संपवत असल्याचे सांगितले आहे. या पत्रात त्याने म्हटले आहे की, तो कर्ज वसुलीचे लक्ष्य पूर्ण करू शकत नसल्यामुळे तीव्र तणावात होता आणि त्याचे वरिष्ठ त्याच्यावर सतत तणाव आणत होते. "मी गेल्या 45 दिवसांपासून झोपलेलो नाही. मला फारसे जेवणही केले नाही. कामाच्या तणावामुळे मी संपलो आहे," असे त्याने लिहिले आहे.

कुटुंबाची जबाबदारी-

तरुण याने आपल्या पत्रात कुटुंबाची काळजी घेण्याची विनंती केली आहे. त्याने आपल्या मुलांच्या शाळेच्या फीचा उल्लेख करत कुटुंबाची भविष्याची तयारी केली आहे. "तुम्ही सगळ्यांनी मेघा, यथार्थ आणि पिहूची काळजी घ्यावी," असे त्याने आपल्या कुटुंबीयांना लिहिले. तसेच, आपल्या घराच्या दुसऱ्या मजल्याचे बांधकाम पूर्ण करण्याची मागणीही केली आहे.

वरिष्ठांवर गंभीर आरोप-

तरुणने आपल्या पत्रात स्पष्टपणे वरिष्ठांवर गंभीर आरोप केले आहेत. त्याने आपल्या वरिष्ठांचे नाव घेऊन कुटुंबाला त्यांच्या विरोधात पोलिस तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. "त्यांनीच माझ्यावर हा निर्णय घेण्यास भाग पाडले," असे त्याने आत्महत्येच्या पत्रात लिहिले आहे.

तरुणच्या या टोकाच्या निर्णयामुळे देशभरात खळबळ माजली आहे.  कामाच्या दबावामुळे होणाऱ्या आत्महत्या आणि विषारी कार्यसंस्कृतीवर लोक चर्चा करत आहेत. अशाच प्रकारच्या प्रकरणात चार्टर्ड अकाउंटंट अ‍ॅना सेबॅस्टियन पेरायल यांनीही कामाच्या तीव्र तणावामुळे आत्महत्या केली होती, ज्यामुळे सोशल मीडियावर प्रचंड संताप निर्माण झाला होता.

या प्रकरणी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, वरिष्ठ पोलीस अधिकारी विनोद कुमार गौतम यांनी सांगितले की, "पत्रात वरिष्ठांवर तणाव आणल्याचे नमूद आहे. कुटुंबाकडून तक्रार प्राप्त झाल्यास आम्ही योग्य ती कारवाई करू."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT