Bangalore house under scrutiny after Rahul Gandhi claims 80 voters registered at single address esakal
देश

Rahul Gandhi's Allegation Fact Check : बंगळुरूमधील एका छोट्याशा घराच्या पत्यावर चक्क ८० मतदार! , राहुल गांधींच्या दाव्यात खरंच तथ्य आहे?

Is Rahul Gandhi's claim about 80 voters at a single Bangalore address true? : जाणून घ्या, तपासाअंती नेमकं काय वास्तव आले आहे समोर?

Mayur Ratnaparkhe

80 Voters Registered at One Address in Bangalore: लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी गुरुवारी भाजप आणि निवडणूक आयोगावर 'मत चोरी'चा आरोप केला. तसेच या दरम्यान, त्यांनी बंगळुरू सेंट्रल मतदारसंघात मतांमध्ये हेराफेरीचा आरोप केला. यावर इंडिया टुडेने बंगळुरू सेंट्रल मतदारसंघात मतांमध्ये हेराफेरीच्या दाव्यांचे वास्तव जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

यासाठी, शहराच्या आयटी कॉरिडॉर, आउटर रिंग रोडजवळील महादेवपुराच्या बूथ क्रमांक ४७० वर लक्ष केंद्रित केले गेले. मुनी रेड्डी गार्डनमधील घर क्रमांक ३५ बद्दल माहिती काढण्याचा प्रयत्न करण्यात आला, ज्याबद्दल राहुल गांधींनी दावा केला होता की, या ठिकाणाहून सुमारे ८० मतदारांनी बनावट नोंदणी केलेली आहे. अवघ्या दहा-पंधरा चौरस फूट आकाराच्या या घरात सध्या पश्चिम बंगालमधून आलेले फूड डिलिव्हरी वर्कर दीपांकर राहत आहेत आणि जे अवघ्या महिनाभरापूर्वीच येथे आले होते. त्यांनी सांगितले की त्यांची बंगळुरूमध्ये मतदार नोंदणी नाही आणि त्या पत्त्याशी जोडलेल्या मतदार यादीतील नावे ते ओळखत नाहीत.

तसेच दीपंकर म्हणाले की, हे घर जयराम रेड्डी यांचे आहे, जे भाजपशी संबंधित असल्याचे त्यांनी सांगितले. रेड्डी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सुरुवातीला भाजपशी असलेले त्यांचे संबंध मान्य केले, परंतु नंतर ते म्हणाले की ते फक्त भाजपचे मतदार आहेत आणि पक्षाचे कार्यकर्ते नाहीत. त्यांनी कबूल केले की अनेक भाडेकरू वर्षानुवर्षे तेथे राहत होते आणि त्यांनी मतदार म्हणून त्यांची नावे नोंदवली होती, परंतु त्यापैकी बहुतेक जण आता बाहेर पडले आहेत. असे असूनही, त्यांनी सांगितले की काही जण निवडणुकीच्या वेळी मतदान करण्यासाठी परत येतात.

जयराम रेड्डी यांनी कबूल केले की त्यांनी या विसंगतींबद्दल निवडणूक अधिकाऱ्यांना माहिती दिली नव्हती, परंतु आता ते माहिती देणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे. इंडिया टुडेशी बोलताना त्यांनी पुष्टी केली की मतदार यादीत त्या पत्त्यावर ८० लोकांची नोंदणी झाली आहे, खरंतर घरात एवढी लोक राहू शकतच नव्हती. त्यांनी दावा केला की बरेच लोक ओडिशा, बिहार आणि मंड्यासह इतर राज्यांमध्ये किंवा जिल्ह्यांमध्ये स्थलांतरित झाले आहेत, परंतु त्यापैकी काही अजूनही निवडणुकीच्या वेळी मतदान करण्यासाठी परत येतात हे मान्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचं टेन्शन संपलं! e-KYC करताना एरर येतोय? हा आहे उपाय; नाहीतर १५०० रुपये बंद होतील

गोंडस हावभाव, साडी आणि सन्मान, राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात त्रिशाने वेधलं लक्ष, साडी नेसून स्विकारला पुरस्कार, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Olympic Election 2025: महाराष्ट्र ऑलिंपिक निवडणुकीत बास्केटबॉल संघटनेवर आक्षेप, महा संघटनेचा न्यायालयात जाण्याचा इशारा

Stock Market Opening: शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स 204 अंकांनी घसरला; निफ्टीही 25,100च्या खाली, कोणते शेअर्स वाढले?

Argentina Friendly Match in India: विश्‍वविजेता अर्जेंटिनाचा संघ केरळमध्ये खेळणार, नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियाशी लढणार; क्रीडा विभागाकडून माहिती

SCROLL FOR NEXT