देश

कोरोनाच्या लशीने पॅरालिसीस झाला बरा

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : कोरोनाच्या महासाथीने (Corona) अनेकांचं अनेक प्रकारे नुकसानच झालंय. अनेकांना आपले जीवलग गमवावे लागलेत तर अनेकांना या आजारातून बरे झाल्यानंतरही काही दिर्घकालीन समस्यांना सामोरं जावं लागतंय. लॉकडाऊन (Corona Lockdown) लागू केल्यानंतर अनेकांचं आर्थिक नुकसान होऊन पैशांचं गणित कोलमडलंय तर काही जणांच्या घरातील कर्ताधर्ता माणूस गमावल्याने घरच मोडकळीस आल्याचं चित्र आहे. असं असलं तरी काहींना अपवादात्मक परिस्थितीत फायदाही झाल्याचं चित्र आहे. कोरोनाची लस (Corona Vaccine) घेतल्यानंतर कोरोनापासून बचाव कितपत झाला, हा संशोधनाचा विषय तुर्तास बाजूला ठेवू. मात्र, कोरोनाची लस घेतल्यानंतर अंथरुणाला खिळलेला एक रुग्ण पूर्णपणे बरा झाल्याचा दावा स्वत: त्या रुग्णानेच केला आहे.

काय आहे हे प्रकरण?

झारखंड (Jharkhand) राज्यातील बोकारोमधील सालगदीह गावातील ही घटना आहे. या गावातील दुलारचंद नावाचा एक व्यक्ती गेली सुमारे चार वर्षे अर्धांगवायूमुळे (paralysis)अंथरुणाला खिळूनच होते. कोरोनाच्या महासाथीमध्ये त्यांना विषाणूची लागण होऊन आणखी तब्येत बिघडू नये म्हणून त्यांनी कोरोनाची कोविशील्ड (Covishield) ही लस घेतली. मात्र, ही कोविशील्ड लस त्यांच्यासाठी अमृत ठरली आहे, असा त्यांनी दावा केला आहे. कारण गेल्या 4 जानेवारीला त्यांनी ही लस घेतल्यानंतर त्यांच्या पायामध्ये हालचाल होत असल्याचा दावा त्यांनी केलाय. यामुळे त्यांना अपरिमित आनंद झाल्याचंही त्यांनी नमूद केलंय.

या दाव्याबाबत बोलताना बोकारो गावातील सिव्हील सर्जन डॉ जितेंद्र कुमार यांनी म्हटलंय की, मी ही केस पाहून थक्क झालोय. मात्र, शास्त्रज्ञांकडून त्यांच्या या दाव्याबाबत अभ्यास करुन खात्री करणे आवश्यक आहे. हा व्यक्ती मोठ्या काळापासून अंथरुणाला खिळून होता जो आता बरा झाला आहे. परंतु लस घेतल्यानंतर 4 वर्षांच्या या स्थितीतून अचानक बरे होणे अविश्वसनीय असल्याचं त्यांनी म्हटलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

Bombay High Court : पोटगीची मागणी म्हणजे खंडणीच, उच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी, नेमकं काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

SCROLL FOR NEXT