देश

‘राज्योत्सवा’मुळे बेळगाव महापौरांची कोंडी

सकाळवृत्तसेवा

बेळगाव - महापालिकेत राज्योत्सव पूर्वतयारी बैठक घेण्याच्या महापौर बसाप्पा चिक्कलदिन्नी यांच्या निर्णयामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. गेल्या आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या राज्योत्सव पूर्वतयारी बैठकीत चिक्कलदिन्नी यांनी गुरुवारी (ता. ११) महापालिकेत अधिकाऱ्यांसाठी पूर्वतयारी बैठक घेण्याचे जाहीर केले आहे. पण, त्यांच्या या निर्णयाला मराठी नगरसेवकांनी विरोध केला आहे. महापौरांनी बैठक घेतली तर महापालिकेतील समझोता एक्‍स्प्रेस घसरण्याची भीती आहे.

विद्यमान सभागृहात पहिले चार महापौर मराठी भाषिक होते. त्यांनी कधी महापालिकेत राज्योत्सव पूर्वतयारी बैठक घेतली नाही की राज्योत्सवातही सहभागी झाले नाहीत. मराठी भाषिक राज्योत्सवादिवशीच म्हणजे १ नोव्हेंबर रोजी काळा दिन पाळतात. केंद्र शासनाच्या निषेधार्थ बेळगावात मूक सायकल फेरी काढली जाते. या फेरीत महापौर, उपमहापौर व मराठी नगरसेवकही सहभागी होतात. यंदा केवळ आरक्षणामुळेच चिक्कलदिन्नी यांना महापौरपद मिळाले आहे. ते कन्नड भाषिक असल्यामुळे राज्योत्सव पूर्वतयारी बैठकीत सहभागी झाले. शिवाय त्यांनी महापालिकेतही बैठक घेण्याची घोषणा केली. पण, मराठी नगरसेवकांच्या विरोधामुळे त्यांची चांगलीच कोंडी झाली आहे. 

गुरुवारी सकाळी ही बैठक होणार असली तरी बैठकीची माहिती अद्याप कौन्सिल किंवा प्रशासन विभागाला नाही. महापालिकेत आजवर सिद्धनगौडा पाटील, प्रशांता बुडवी, यल्लाप्पा कुरबर, एन. व्ही. निर्वाणी यांच्यानंतर चिक्कलदिन्नी हे पाचवे कन्नड महापौर आहेत. प्रत्येक कन्नड महापौराने महापालिकेत कानडीकरणाचा प्रयत्न केला आहे. पण, राज्योत्सव पूर्वतयारी बैठक घेण्याचे धाडस केले नव्हते. पण, चिक्‍कलदिन्नी यांनी ते केले असून ते त्यांच्या अंगलट येण्याची शक्‍यता आहे.
दबावाचे बळी

महापालिकेत मराठी नगरसेवकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे मराठी नगरसेवकांचा विरोध पत्करून महापौरांना कामकाज करता येणार नाही. सर्वसाधारण सभाही सुरळीत चालविता येणार नाही. बैठक घेण्याचे जाहीर करताच मराठी नगरसेवकांनी महापौरांना जाब विचारला आहे. कन्नड प्रसारमाध्यमांच्या दबावाला बळी पडून बैठक घेण्याचे जाहीर केल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Ads Policy: डीपफेक पॉर्न बनवणाऱ्या अ‍ॅप्सवर गुगल करणार सर्जिकल स्ट्राईक, कडक केले जाहिरातीचे नियम

Kidney Transplant : आईने किडनी देऊन मुलाला दिले जीवनदान ; नांदेड येथे यशस्वी किडनी प्रत्यारोपण

CISCE Result 2024 : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल जाहीर; एका क्लिकवर पाहा रिझल्ट

Kangana Ranaut: कंगनानं थेट बिग बींसोबत केली स्वत:ची तुलना; भाषणाचा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, म्हणाले...

Latest Marathi News Update : नाशिकमध्ये कपालेश्वर हॉटेलच्या मागच्या बाजूला आग

SCROLL FOR NEXT