Bhagwant Mann 
देश

Bhagwant Mann : '....मला आधीच माहित होतं'; भगवंत मान यांनी सांगितला अमृतपालच्या अटकेचा थरार

रवींद्र देशमुख

नवी दिल्ली - अमृतपाल सिंग याच्या अटकेनंतर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. मान यांनी पत्रकार परिषद घेऊन घटनेची सविस्तर माहिती दिली आहे. या कारवाईची आपल्याला आधीच पूर्ण कल्पना होती आणि यामुळे आपण रात्रभर झोपलो नाही, अस ते म्हणाले.

पंजाब पोलिसांना ठरवलं असतं तर अमृतपालला १८ मार्चलाही अटक करता आली असती, पण त्यानंतर पोलिसांनी संयम दाखवला. यावेळी अमृतपाल याच्या अटकेमुळे मुख्यमंत्री खूश झाले असून त्यांनी पंजाब पोलिसांचे भरभरून कौतुक केले आहे.

देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्यांना कोणत्याही किंमतीत सोडले जाणार नाही आणि त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे. अटकेपूर्वीच्या घटनांबाबत मुख्यमंत्री म्हणाले की, मी दर १५ मिनिटांनी पोलिसांशी बोलत होतो. माझा एकच हेतू होता, अटकेदरम्यान रक्तपात होता कामा नये. पंजाबसाठी मी रात्री झोपलो नाही. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखणे महत्त्वाचं, असल्याचं ते म्हणाले.

भगवंत मान म्हणाले की, पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन झाल्यापासून कायदा व सुव्यवस्था आणि लोकांची सुरक्षा मजबूत करण्यासाठी सातत्याने काम केले जात आहे. कोणत्याही सामान्य नागरिकाला त्रास देण्याचा सरकारचा आणि पंजाब पोलिसांचा हेतू नाही, असेही मान यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT