Covid 19 Nasal Vaccine Sakal
देश

Covid-19 Vaccination: नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लसीला आता भारतातही परवानगी

सकाळ डिजिटल टीम

कोरोना प्रतिबंधक लसीकरण सध्या देशात वेगाने सुरू आहे. लसीच्या पहिल्या दोन मात्रांसह बुस्टर डोसही सध्या देशात दिला जात आहे. अशातच आता बहुप्रतिक्षित नाकावाटे दिली जाणारी लस तयार झाली आहे. या लसीच्या वापरालाही परवानगी देण्यात आली आहे.

भारत बायोटेकला DCGI कडून नाकावाटे दिल्या जाणाऱ्या कोविड 19 लसीच्या आपत्कालीन वापराची परवानगी मिळाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविय यांनी दिली आहे. नाकावाटे दिली जाणारी ही भारतातली पहिली कोरोना प्रतिबंधक लस असेल.

कशी असते ही लस?

इतर लसी दंडात दिल्या जातात. यामध्ये औषध स्नायूंमध्ये जाणं गरजेचं असतं. मात्र ही नवी लस स्नायूत देण्याची गरज नाही. नाकामध्ये दोन ते तीन थेंब टाकून ही लस देण्यात येते. नाक चोंदल्यास आपण जो स्प्रे वापरतो, त्याप्रमाणेच ही लस देता येणार आहे. भारत बायोटेकने घेतलेल्या चाचण्यांमध्ये या लसीचे कोणतेही साईड इफेक्ट्स आढळून आले नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मार्च, एप्रिलचा हप्ता जमा झाला नाही, काळजी नसावी! कधी जमा होणार असे करा चेक?

सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ, ३ दिवसात ३ रुपयांनी झाला महाग

Latest Marathi News Live Update : विदर्भ, मराठवाड्याला उष्णतेच्या लाटेचा तर कोकणात पावसाचा इशारा

‘मामाच्या गोव्याला जाऊया’ चे ठेका धरायला लावणारे टायटल साँग प्रदर्शित; अवधूत गुप्तेंच्या आवाजात स्वरबद्ध

Maharashtra Voter List: राज्यात एक कोटी मतदार वगळणार ? 'एसआयआर'मध्ये मुंबई, ठाणे, पुण्यात सर्वाधिक मतदार बाद होण्याचा अंदाज!

SCROLL FOR NEXT