देश

महाराजा रणजीत सिंहाच्या पुतळ्याची तोडफोड; भाजपने केला पाकिस्तानचा निषेध

विनायक होगाडे

नवी दिल्ली : पाकिस्तानातील लाहोरमध्ये महाराजा रणजीत सिंह यांच्या प्रतिमेची पुन्हा एकदा नासधुस करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान (टीएलपी) संघटनेशी निगडीत एका व्यक्तीवर हा पुतळा तोडण्याचा आरोप आहे. पाकिस्तानमध्ये हिंदू संस्कृतीतील प्रतिकांना वारंवार लक्ष्य केलंय जातंय. गेल्या काही दिवसांपूर्वी पाकिस्तानमध्ये गणपती मंदिराची तोडफोड करण्यात आली होती. त्यानंतर आता आणखी एका प्रतिकाची तोडफोड करण्यात आली आहे. यासंदर्भात आता भाजपने आक्रमक भुमिका घेत या प्रकाराचा निषेध नोंदवला आहे.

यासंदर्भात निषेध नोंदवण्यासाठी दिल्लीतील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तान उच्च आयुक्तांच्या कार्यालयासमोर निदर्शने केली आहेत. ज्यांनी पाकिस्तानातील लाहोरमधील महाराजा रणजीत सिंहांच्या पुतळ्याची तोडफोड केली आहे, त्यांना अटक झाली पाहिजे, अशी मागणी दिल्ली भाजपचे अध्यक्ष आदेश गुप्ता यांनी केली आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने दिली पाकला समज

याबाबत केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी म्हटलंय की, लाहोरमधील महाराजा रणजीत सिंह यांच्या प्रतिमेची नासधुस करण्याच्या प्रकाराची माहिती मिळाली आहे. २०१९ मध्ये या पुतळ्याचं अनावरण झाल्यानंतर तिसऱ्यांदा या प्रकारची घटना घडली आहे. अल्पसंख्याक समुदायाविरोधातील हिंसाचाराच्या घटना, ज्यात त्यांची प्रार्थनास्थळे, त्यांचा सांस्कृतिक वारसा आणि त्यांच्या खाजगी मालमत्तेवरील हल्ल्यांचा घटनांमध्ये गतीने वाढ होत आहे. अगदी गेल्या १२ दिवसांपूर्वी एका झुंडीकडून गणपती मंदिराची तोडफोड करण्यात आली होती. अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यामध्ये पाकिस्तानी शासनाला पूर्णपणे अपयश आलं आहे. आम्ही पाकिस्तान सरकारला त्यांच्या अल्पसंख्यांक समुदायाची सुरक्षा, कल्याणाची काळजी घेण्याचं आवाहन करतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: मद्यपाशातून मुक्तीसाठी ५० रुग्णालयांत जनजागृती स्टॉल

टॉप थ्री वगळून ४ ते ६ नंबरच्या न्यायाधीशांची शिफारस; सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियमने घेतलेल्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

आयआयटीत मृत्यूचे सावट! २० वर्षांत १७१ विद्यार्थ्यांची आत्महत्या, धक्कादायक वास्तव समोर

SCROLL FOR NEXT