bihar 15 years old boy asked for death from president
bihar 15 years old boy asked for death from president 
देश

मला जगायची इच्छाच राहिली नाही...

वृत्तसंस्था

नवी दिल्लीः वडील कर्करोगाने त्रस्त असून, मी वडीलांजवळच राहतो. आई-वडील विभक्त राहात आहेत. कुटुंबाच्या वादाला कंटाळलो असून, मला जगायची इच्छाच राहिली नाही. बिहारमधील भागलपूर जिल्ह्यातील कृष कुमार मित्रा (वय 15) या मुलाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे इच्छा मरणाची मागणी केली आहे.

कृषने दोन महिन्यापूर्वी कौटुंबिक वादाला कंटाळून थेट राष्ट्रपतींना पत्र पाठवून इच्छा मरणाची परवाणगी मागितली. राष्ट्रपतींना पाठवलेल्या पत्राची प्रत कृषने पंतप्रधान कार्यालय, बिहारचे मुख्यमंत्री आणि इतर सरकारी आधिकाऱ्यांनाही पाठवली आहे. प्रधानमंत्री कार्यालयाने या प्रकरणावर जिल्हा प्रशासनाला तपासाचे आदेश दिले आहेत.

कृषने पत्रामध्ये म्हटले आहे की, 'मी नववीमध्ये शिक्षण घेत असून, आई-वडील विभक्त राहात आहेत. कौटुंबिक त्रासाला कंटाळलो आहे. सार्वजनिक ठिकाणी आईचा सतत होणारा अपमान आणि सतत मिळणाऱ्या धमक्यामुळे मला त्रास होत आहे. मला जगायची इच्छाच राहिली नाही. मला इच्छा मरणाची परवाणगी द्यावी.'

दरम्यान, भारतात इच्छा मरणाला कायदेशीर मान्यता मिळालेली नाही. स्वित्झर्लंड, जपान, जर्मनी, अमेरिका या देशांमध्ये युथनेशियाला कायदेशीर मान्यता मिळालेली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 02 मे 2024

IPL 2024, CSK vs PBKS: पंजाब किंग्सने करून दाखवलं, चेन्नईला सलग पाचव्यांदा हरवलं

ग्रीन नोबेलचा मानकरी

Latest Marathi News Live Update : काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी राहुल गांधी आज कर्नाटक दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT