nitish_kumar_2.jpg
nitish_kumar_2.jpg 
देश

बिहारमध्ये हुकूमशाही वाढतेय; पासवान यांची नितीश कुमारांवर टीका

सकाळन्यूजनेटवर्क

पाटणा- बिहारमध्ये सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) पक्षांमध्ये निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांना रस्ते, उड्डाणपूल, इमारतींच्या भूमिपूजनावर भर दिला आहे. त्याच वेळी लोक जनशक्ती पक्षाचे (एलजेपी) चिराग पासवान हे बिहारमधील ‘एनडीए’चा चेहरा असलेल्या नितीश कुमार यांच्यावर टीकेचा भडिमार सुरू केला आहे.

पासवान यांचा पक्ष ‘एनडीए’चाच एक भाग आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुख्यमंत्री नितीश कुमार हे सुशासनाचे प्रतीक असल्याचे गौरवोद्गार काढत असतानाच बिहारमध्ये हुकूमशाही वाढत असल्याचा आरोप चिराग पासवान करीत आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून चिराग नितीश कुमारांवर टीका करीत आहेत. याविरोधात त्यांचे समर्थक आता मैदानात उतरले आहेत किंवा त्यांना उभे केले आहे. संयुक्त जनता दला (जेडीयू)चे आमदार ललन पासवान यांनी तर नितीश कुमार यांची तुलना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी केली. दलितांसाठी काम करणाऱ्यांमध्ये आंबेडकर यांच्यानंतर एकमेव नितीश कुमार आहेत, अशी स्तुतिसुमने त्यांनी मुख्यमंत्र्यांवर उधळली.

‘चिराग लहान आहेत’

महाआघाडीतून बाहेर पडत नितीश कुमार यांच्या छायेखाली आलेल्या जितनराम मांझी यांच्यावर आता चिराग पासवान यांना उत्तर देण्याची जबाबदारी सोपविली आहे. मांझी म्हणाले की, चिराग पासवान यांना काही समजत नाही. अजून ते लहान आहेत. पक्षाची धुरा सांभाळली म्हणजे कोणी मोठा होत नाही. सत्तेत भागीदार असूनही चिराग पासवान हे नितीश कुमारांवर टीका करण्याची संधी सोडत नाही.

पासवान हे विरोधी पक्षात असल्यासारखे सरकारवर आरोप करीत असल्याचे चित्र सध्या आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात भाजपने शांत बसणे पसंत केले आहे. बिहारच्या राजकारणात स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी आपल्याच सरकारचे मुख्य टीकाकार बनले आहेत, असे भाजपचे म्हणणे आहे. पासवान यांच्या भाषणबाजीमागे जागा वाटपात लाभ मिळावा हा हेतू असल्याचे सूत्रांचा दावा आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: उदयनराजेंच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी कराडमध्ये दाखल

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT