Teachers Sakal
देश

Video : मुख्याध्यापिकेला भिडली शिक्षिका; मारहाण करत वर्गातून थेट शेतात; चप्पल, लाथा, झिंज्या ओढत...

एका शिक्षिकेची आईसुद्धा दुसऱ्या शिक्षिकेला चप्पलेने मारहाण करताना दिसत आहे.

सकाळ डिजिटल टीम

पटना : बिहारमधील पटना येथील एका शाळेतील दोन शिक्षिकेच्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एक मुख्याध्यापिका आणि दुसरी सहाय्यक शिक्षिका असून दोघींनीही एकमेकींनी धू धू धुतलं आहे. वर्गातून बाहेर येत थेट शेतात जाईपर्यंत एकमेकांना मारहाण करताना या दोन्ही शिक्षिका दिसत आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अधिक माहितीनुसार, ही घटना पटना येथील बिहटा प्रखंड येथील एका विद्यालयातील असून तेथील मुख्याध्यापिका आणि सहाय्यक शिक्षिका यांच्यामध्ये वाद होता. त्यांच्यामध्ये एका गोष्टीवरून क्लासरूममध्ये वाद पेटला आणि शाळेतील विद्यार्थ्यांसमोरच त्यांनी एकमेकांना मारायला सुरूवात केली. यामध्ये एका शिक्षिकेची आईसुद्धा दुसऱ्या शिक्षिकेला चप्पलेने मारहाण करताना दिसत आहे.

दरम्यान, शाळेतील वर्गात सुरू झालेली ही लढाई शाळेच्या पाठीमागे असलेल्या शेतापर्यंत जाऊन पोहोचली. दोघीही एकमेकांचे केस ओढून चप्पलेने, लाथेने, चापटेने मारताना करताना दिसत आहेत. तर काही महिला त्यांच्यातील वाद सोडवण्याचा प्रयत्नही करताना दिसत आहेत. यादरम्यान गावातील काही तरूणांनी या घटनेचा व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.

या घटनेबद्दल बोलताना शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितलं की, हा शाळेतील त्यांच्यामध्ये असलेला वैयक्तिक मुद्दा आहे. त्यांच्याकडे या मारहाणीबद्दल स्पष्टीकरण मागितले असून उच्च अधिकाऱ्यांनाही या घटनेसंदर्भात माहिती दिली आहे. अशा घटनांमुळे शाळेतील लहान मुलांवर वाईट परिणाम होत असतात. त्यामुळे शाळेतील शिक्षकांमधले वाद थांबायला हवेत अशा प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रस्त्याच्या दर्जावरून लोकांनी प्रश्न विचारले, व्हिडीओ शूट करणाऱ्या तरुणाला मंत्र्यांने कानशिलात लगावली; VIDEO VIRAL

Ahilyanagar District Bank : अहिल्यानगर जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी गुप्त बैठक; सुजय विखेंचा थोरातांना वाकून नमस्कार चर्चेत

रिपोर्टवर ‘नॉर्मल’ लिहिलंय म्हणून खुश होऊ नका! हृदयाच्या आरोग्यासाठी कोलेस्ट्रॉलची आकडेवारी समजून घ्या!

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत वाघाचे अवयव आणि २ खवले मांजर जप्त

Asian Games 2026 : नाशिकच्या सर्वेश कुशारेनं जिंकलं ऐतिहासिक पदक! भारताच्या खात्यात १५ मिनिटांच्या अंतरानं ४ मेडल्स

SCROLL FOR NEXT