Bilkis Bano  esakal
देश

Bilkis Bano Case : बिल्किस बानो प्रकरणातील दोषींच्या सुटकेविरुद्ध 7 ऑगस्टला सुप्रीम कोर्टात सुनावणी

संतोष कानडे

नवी दिल्लीः बिल्किस बानो प्रकरणामध्ये ११ आरोपींच्या शिक्षेत सूट देत हायकोर्टाने त्यांना मुक्त केलं होतं. या सुटकेच्या विरोधात अनेक याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल झालेल्या आहेत. येत्या ७ ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टात या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

बिल्किस बानो प्रकरणातील दोषींपैकी ११ दोषींची गुजरात सरकारनं मुदतीपूर्वीच मुक्तता करण्याचा निर्णय घेतला होता. मुक्ततेनंतर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर या दोषींचा हारतुरे देऊन सत्कार करण्यात आला होता. यावरुन मोठा गदारोळही झाला होता. गुन्हेगारांचं अशा प्रकारे उदात्तीकरण करण्यात आल्यानं गुजरात सरकारवर मोठ्या प्रमाणावर टीकाही झाली होती.

दरम्यान, या अकरा आरोपींची मुक्तता करण्याच्या गुजरात सरकारच्या निर्णयावर आक्षेप घेत या प्रकरणातील प्रमुख पीडित बिल्किस बानो यांच्यावतीनं सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं होतं. या आव्हान याचिकेची सुप्रीम कोर्टानं दखल घेतली आहे.

सुप्रीम कोर्टाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलेलं आहे की, जबाब दाखल झाल्यानंतर या प्रकरणाची सुनावणी टळणार नाही. ७ ऑगस्टपासून रेग्युलर सुनावणी होणार आहे. या प्रकरणी न्यायमूर्ती बीव्ही नगररत्न आणि उज्वल भुईया यांच्या खंडपीठाने सांगितले की, युक्तिवाद पूर्ण झाला असून सर्व दोषींना नोटीस बजावण्यात आली आहे.

या प्रकरणातील युक्तिवाद पूर्ण झाला असून सर्वांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. 9 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने गुजराती आणि इतर भाषांसह स्थानिक वृत्तपत्रांमध्ये नोटीस प्रकाशित करण्याचे निर्देश दिले होते. आता ७ ऑगस्ट रोजी या प्रकरणाची सुनावणी होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur Accident: भाविकांचे वाहन उलटले, एक ठार, सतरा जखमी; भटाळा येथे गेले होते दर्शनासाठी

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Pune News: रेल्वे चालकाला सात किलोमीटर आधीच दिसणार सिग्नल; प्रवाशांना सुरक्षेचे ‘कवच ४.०’, २५० किमीवर यशस्वी चाचणी!

Rohit Sharma चे खिलाडूवृत्तीचं ज्ञान पाजळणाऱ्या पाकिस्तानला कृतीतून उत्तर! IND vs PAK मॅचआधी वसीम अक्रमशी गळाभेट; Video Viral

Nagpur Crime : भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी, संतप्त कार्यकर्त्यांची रुग्णालयासमोर गर्दी

SCROLL FOR NEXT