Shobha Gupta_Bilkis Bano 
देश

Bilkis Bano Advocates: बिल्किस बानोच्या वकील अ‍ॅड. शोभा गुप्ता यांना बढती; सुप्रीम कोर्टानं दिला वरिष्ठ वकिलाचा दर्जा

त्यांना बढती का देण्यात आलं जाणून घ्या

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टानं आज ५६ वकील आणि अॅडव्होकेट-ऑन-रेकॉर्ड (AoR) यांना वरिष्ठ वकील म्हणून नियुक्त केलं आहे. यामध्ये बिल्किस बानो सामुहिक बलात्कार आणि कुटुंबियांच्या हत्या प्रकरणातील वकील अॅड. शोभा गुप्ता यांना बढती मिळाली आहे. (Bilkis Bano lawyer Advocate on Record Shobha Gupta gets senior designation from supreme court)

शुक्रवारी पार पडली बैठक

सरन्यायाधीश आणि इतर न्यायाधिशांची एक बैठक शुक्रवारी पार पडली. या बैठकीत ५६ वकिलांना आणि अॅडव्होकेट ऑन रेकॉर्ड यांची वरिष्ठ वकील म्हणून नियुक्ती केली. शोभा गुप्ता या बिल्किस बानो प्रकरणात अॅडव्होकेट ऑन रेकॉर्ड आहेत. म्हणजेच त्या अशा कायदेशीर व्यावसायिक आहेत ज्या सुप्रीम कोर्टात प्रॅक्टिस करण्यास पात्र आहेत. (Latest Marathi News)

'या' लोकांना मिळाली बढती

शोभा गुप्ता यांच्यासह गौरव अग्रवाल, मोहम्मद शोएब अलाम, अमित आनंद तिवारी, स्वरुपमम चतुर्तेवदी, अर्धेंदूमाऊल कुमार प्रसाद, सुनील फर्नांडिस, तापेश कुमार सिंह आणि गगन गुप्ता या वकिलांचीही वरिष्ठ वकिल म्हणून सुप्रीम कोर्टानं नियुक्ती केली आहे. त्याचबरोबर सुप्रीम कोर्टानं १९८ नवे AoR नियुक्त केले आहेत. या सर्व नवनियुक्त AoRचं सरन्यायाधीस डी. वाय. चंद्रचूड यांनी अभिनंदन केलं आहे. यावेळी चंद्रचूड म्हणाले की, मला आनंद आहे की, अनेक महिला वकिलांनी AoR ची परीक्षा उत्तीर्ण केली. (Marathi Tajya Batmya)

घटनेच्या कलम 145 अंतर्गत सुप्रीम कोर्टानं तयार केलेल्या नियमांनुसार, केवळ वकील-ऑन-रेकॉर्ड म्हणून नियुक्त केलेले वकील सुप्रीम कोर्टात खटले दाखल करू शकतात, जे वर्षातून दोनदा AoR परीक्षा घेतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Atal Setu EV Toll Waiver : इलेक्ट्रिक वाहनांना अटल सेतूवर आजपासून टोलमाफी; पुणे-मुंबई एक्सप्रेस वे आणि 'समृद्धी' वरही दोन दिवसांत लागू

Chandrakant Patil : व्हिजन ठेवल्यास समाजाचा सर्वांगीण विकास, मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सल्ला; ‘सकाळ प्लस स्टडीरूम’च्या ई-पेपरचे प्रकाशन

Shivaji Maharaj : शिवाजी महाराजांच्या काळात कॉफी खरंच होती का? डच पाहुण्यांना नेमका कसा केला होता पाहुणचार?

शेतकऱ्यांच्या डाेळ्यात पाणी! 'सातारा जिल्ह्यातील शंभर हेक्टरवरील पिकांना फटका': अतिवृष्टीत खरीप पिकांचे मोठे नुकसान

Satara child health: 'साताऱ्यात लहान मुलांमध्ये वाढले संसर्गजन्य आजार'; सर्दी, खोकला, ताप, जुलाबाचे रुग्ण

SCROLL FOR NEXT