Bio metric Token Service Team eSakal
देश

रेल्वेची बायोमेट्रिक टोकन सेवा सुरू; प्रवाशांचे श्रम होणार कमी

सिकंदराबाद रेल्वे स्टेशनवर प्रथमच ही सेवा सुरू करण्यात आली आहे.

सुधीर काकडे

भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सुविधेसाठी वेगवेळ्या स्मार्ट सेवा सुरु करत असल्याचे पाहायला मिळते आहे. त्यातच आता रेल्वे विभागाने बायोमेट्रिक टोकन मशीन सेवा (Bio metric Token Service) सुरू केली आहे. प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी तसेच रेल्वेत जागा मिळवण्यासाठी होणारी स्थानकावरील प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वे विभागाने (South Central Railway) नुकतीच बायोमेट्रिक टोकन मशीन सेवा सुरू केली. सिकंदराबाद रेल्वे स्टेशनवर प्रथमच ही सेवा सुरु करण्यात आली आहे. नव्याने बसवलेल्या बायोमेट्रिक टोकन मशीनमुळे मोठ्या रांगा लागून होणारी गैरसोय टाळता येणार आहे. आरक्षण नसलेल्या बोगीत जागा मिळवण्यासाठी होणारी गर्दी आणि गोंधळ टाळण्याच्या हेतून ही सुविधा सुरु करण्यात आली आहे.

रेल्वे विभागाने सुरु केलेली ही सुविधा वापरण्यासाठी सर्वप्रथम, मशीन प्रत्येक प्रवाशाची माहिती रेकॉर्ड करते. ज्यामध्ये त्यांचा पीएनआर क्रमांक, रेल्वे क्रमांक प्रवासाचे अंतिम ठिकाण रेकॉर्ड करते. यानंतर, फोटो आणि फिंगर प्रिंटने बायोमेट्रिक माहिती घेतली जाते. एकदा ही माहिती मिळवल्यानंतर, मशीनद्वारे अनुक्रमांकासह टोकन स्वयंचलितपणे तयार केले जाते. त्यानंतर टोकणवर मिळालेल्या क्रमांकाच्या बोगीतच प्रवाशांना चढावे लागेल. याव्यतिरिक्त, रेल्वेमध्ये घडलेल्या गुन्ह्यांचा शोध घेण्यासाठी, बायोमेट्रिक टोकन मशीनद्वारे संग्रहित केलेली माहिती देखील उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे गुन्हेगारीला सुद्धा आळा घालता येणार आहे.

दक्षिण मध्य रेल्वेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या बायोमेट्रिक टोकन मशीनमुळे जनरल क्लासच्या डब्यात प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तासंतास रांगेत उभे राहण्याचे कष्ट प्रवाशांना घ्यावे लागणार नाही. एकदा टोकन प्राप्त झाल्यावर, रेल्वे सुटण्यापूर्वी 15 मिनिटे आधी बोगीपर्यंत पोहोचू शकतो. तसेच द.म.रे. विभागाने असाही दावा केला आहे की, बायोमेट्रिक टोकन मशीन प्रणालीमुळे रेल्वे सुरक्षा दलावरील कामाचा ताण देखील कमी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune RTO: ''पुण्याची ओळख कायम राहणार'', 'MH 12'साठी मुरलीधर मोहोळ नितीन गडकरींच्या भेटीला; म्हणाले...

Cyber Fraud : निर्मला सीतारामन यांच्या डीपफेक व्हिडिओचा गैरवापर; पुण्यातील व्यावसायिकाची तब्बल एक कोटी सात लाखांची ऑनलाइन फसवणूक

Kolhapur Blast: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा स्फोट; नागरिकांमध्ये भीती, पोलिस घटनास्थळी दाखल

Pradeep Rawat: 'गजनी' फेम अभिनेते प्रदीप रावत यांचं निधन; 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Solapur Pune Highway Incident: शिवशाही बसचे ब्रेक फेल; चालकाच्या प्रसंगावधानाने सोलापूर-पुणे महामार्गावरील मोठा अनर्थ टळला, १४ प्रवासी सुखरूप

SCROLL FOR NEXT