Bipin Rawat Chopper Crashes in Tamil Nadu Sakal
देश

जळत्या हेलिकाॅप्टरमधून तिघे आले बाहेर ; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं ...

तामिळनाडू जवळ झालेल्या कुन्नुर अपघातात वायुसेनेच्या हेलिकाॅप्टर दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

तामिळनाडू जवळ झालेल्या कुन्नुर अपघातात वायुसेनेच्या हेलिकाॅप्टर दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. भारताचे सीडीएस बिपिन रावत (Bipin Rawat) यांच्यासोबत १४ जण या हेलिकॉप्टरमध्ये होते. यातील ११ जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. तर बिपिन रावत यांना हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या हेलिकाॅप्टरमधून बिपीन रावत हे वेलिंग्टनच्या डिफेंस स्टाफ काॅलेजमध्ये जात होते. याचवेळी ही दुर्घटना घडली.

तामिळनाडूतल्या कुन्नूर परिसरात लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले. प्रत्यक्षदर्शी नागरीकाने घटनेचे वर्णन सांगितले आहे. त्याचे नाव कृष्णासामी आहे. त्या घटनेचे प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी हेलिकॉप्टर कोसळताना तीन लोक यातून बाहेर उडी घेत असल्याची माहिती समोर आली आहे.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, "मला प्रथम मोठा आवाज ऐकू आला. काय झाले ते पाहण्यासाठी मी बाहेर आलो. एक हेलिकाॅप्टर एका झाडावर आदळून दुसऱ्या झाडावर आदळत पेटले. जेव्हा ते आदळत होते तेव्हा त्याला आग लागली होती. यावेळी ३ जणांनी त्यातून उडी मारली. यावेळी मी साथीदारांनी एकत्र केले आणि बचाव कार्य सुरु केले. जेवढे मृतदेह मिळाले तेव्हा ते ८० टक्के भाजलेले होते.

दरम्यान राजभवन येथे नव्याने तयार करण्यात आलेल्या दरबार हॉलचे उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोवींद यांच्या हस्ते होणार होते. मात्र तामिळनाडू येथे हेलिकॉप्टर दुर्घटना झाल्याने त्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT