BJD Lawmaker Forces Engineer To Do Sit Ups For Poor Road Work
BJD Lawmaker Forces Engineer To Do Sit Ups For Poor Road Work 
देश

आमदाराने काढायला लावल्या उठाबशा; व्हिडिओ व्हायरल

वृत्तसंस्था

भुवनेश्‍वर: पटनागड येथील नव्याने निवडूण आलेले बीजू जनता दलचे (बीजेडी) आमदार सरोज कुमार मेहेर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंताला भर रस्त्यात शंभर उठा बशा काढायला लावल्या. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

बोलांगीर जिल्ह्यातील मंडल-बेलपाडा बायपास रस्त्याचे काम अत्यंत कनिष्ठ दर्जाचे झाले आहे. याबाबत नागरिकांनी त्या मतदारसंघाचे आमदार सरोज मेहर यांच्याकडे तक्रार केली होती. मेहर यांनी कामामध्ये सुधारणा करण्यास सांगितले होते. परंतु, तरीही कामामध्ये सुधारणा झाली नव्हती. कामाची चौकशी करण्यासाठी मेहेर हे बेलपाडा येथे गेले होते. यावेळी त्यांना कनिष्ठ दर्जाचे काम दिसून आले. यामुळे मेहर यांनी अभियंताची कानउघाडनी करत भर रस्त्यातच 100 उठाबशा काढायला लावल्या.

अभियंता उठाबशा काढत असताना नागरिकांनी मोबाईलमधून व्हिडिओ काढला व सोशल मीडियावर व्हायरल केला. राज्यामध्ये व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, नेटिझन्स त्यावर व्यक्तही होत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. रितेश-जेनेलिया देशमुखांनी बजावला मतदानाचा हक्क

Satara Lok Sabha : साताऱ्याचा खासदार कोण होणार? उमेदवारांचे भवितव्य होणार आज यंत्रात बंद

Met Gala 2024 : बावनकशी सौंदर्य ; मेट गालाला आलियाच्या लूकने वेधलं लक्ष... 'हे' आहे तिच्या खास साडीच वैशिष्ट्य

Latest Marathi News Live Update : महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी PM मोदी आज बीड दौऱ्यावर

Sunita Williams: सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी तुर्तास स्थगित; या कारणासाठी मोहीम पुढे ढकलली

SCROLL FOR NEXT