BJP amit Malviya claims Chhattisgarh CM bhupesh baghel played Candy Crush during Congress meeting shares Photo rak94 
देश

Congress News : काँग्रेसच्या महत्त्वाच्या बैठकीत मुख्यमंत्री 'कँडी क्रश' खेळण्यात दंग; भाजपचा फोटो शेअर करत दावा

भाजपचे आयटी सेलचे अध्यक्ष अमित मालवीय यांनी एक फोटो शेअर केला आहे.

रोहित कणसे

केंद्रीय निवडणुक आयोगाने नुकतेच देशातील पाच राज्यातील निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केलं आहे. त्यानुसार छत्तीसगढमध्ये ७ आणि १७ नोव्हेंबर ला दोन टप्प्यात मतदान होणार आहे. यादरम्यान भाजपने छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यावर निशाणा साधला असून काँग्रेसच्या एका महत्त्वाच्या बैठकीदरम्यान बघेल 'कँडी क्रश' खेळत असल्याचा दावा भाजपने केला आहे. काँग्रेसकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाहीये.

भाजपचे आयटी सेलचे अध्यक्ष अमित मालवीय यांनी एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये बैठकीदरम्यान सीएम बघेल फोनवर गेम खेळताना दिसत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनाही खात्री आहे, त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी सरकार येणार नाही, हे त्यांना ठाऊक आहे. कदाचित त्यामुळेच काँग्रेसच्या उमेदवार निवडीसंदर्भातील बैठकीकडे लक्ष देण्याऐवजी त्यांनी कँडी क्रश खेळणे योग्य वाटले, असे मालविय म्हणाले आहेत.

मंगळवारी काँग्रेसच्या छत्तीसगड प्रभारी कुमारी शैलजा यांनी सांगितले होते की, आगामी निवडणुकीत उमेदवारांच्या नावावर चर्चा करण्यासाठी केंद्रीय निवडणूक समितीची १२ ऑक्टोबर रोजी बैठक होणार आहे. ते म्हणाले, येत्या १२ ऑक्टोबरला केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे. अंतिम निर्णय सीईसी घेईल. ते निश्चित झाल्यावर उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाईल.

छत्तीसगढमध्ये राजकारण तापायला सुरूवात

९० जागा मध्ये छत्तीसगडविधानसभेत काँग्रेसने २०१८ साली ६८ जागा जिंकल्या होत्या आणि पूर्ण बहुमत मिळवले होते. तर, भाजप केवळ १५ जागांवर आटोपला. यावेळी भाजपने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा पुढे न करता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने प्रचार सुरू केला आहे. एकीकडे लोककल्याणकारी योजनांचा हवाला देत काँग्रेस पुन्हा सत्तेत येण्यासाठी प्रयत्न करत आत. तर, भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून भाजपने बघेल सरकारला घेरण्याची तयारी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

'आलमट्टी'ची उंची वाढविल्यास सांगली-कोल्हापूरला धोका नाही, महाराष्ट्र सरकार विनाकारण गोंधळ करून घेतंय; आमदाराचं मोठं विधान

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

SCROLL FOR NEXT