Anurag Thakur  Sakal
देश

Anurag Thakur : मुंबईत अजूनही शौचालय नाहीत ही दुर्दैवी गोष्ट आहे

दत्ता लवांडे

नवी दिल्ली : "देशात सर्वांत जास्त टॅक्स कलेक्शन मुंबई महापालिकेतून होते तरी आजही मुंबई शहरात हजारो नागरिकांकडे शौचालये नाहीत. एवढी मोठी महापालिका असूनही शहरात शौचालये नाहीत ही मोठी दुर्दैवी गोष्ट आहे. यामुळे मुलांना आणि महिलांना कोणत्या अवस्थेत जगावं लागत असेल?" असं वक्तव्य केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केलं आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी हे आरोप केले आहेत. त्यानंतर विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी त्यांच्या वक्तव्यावर उत्तर दिलं आहे.

(Anurag Thakur Latest News)

मुंबईत खूप चांगल्या पद्धतीचे शौचालये आहेत. अनुराग ठाकूर यांच्या वक्तव्याला काहीच अर्थ नाही असं म्हणत दानवे यांनी ठाकूर यांचा आरोप फेटाळून लावला आहे. त्याचबरोबर भाजपच्या राम कदम यांनी त्यांच्या आरोपाला पाठिंबा देत दक्षिण मुंबईत अनेक ठिकाणी शौचालयाची गैरसोय असल्याचं सांगितलं. गेली कित्येक वर्षे किशोरी पेडणेकरांची आणि शिवसेनेची सत्ता मुंबई महापालिकेवर आहे. आजही तुम्ही गेलात तर तुम्हाला ही स्थिती अनेक ठिकाणी बघायला मिळेल असा आरोप भाजपच्या राम कदम यांनी केला आहे.

दरम्यान, अनुराग ठाकूर यांच्या वक्तव्यामुळे महानगरगपालिकेच्या निवडणुकीत भाजपचा साकारात्मक प्रभाव पडण्याची शक्यता वर्तवण्यात आहे. तसेच भाजपने राज्यातील सत्तांतरानंतर मुंबई महापालिकेसाठी आपली कंबर कसली आहे. त्या पार्श्वभूमीवर ठाकूर यांचे वक्तव्य शिवसेनेसाठी येणाऱ्या निवडणुकीत आव्हान ठरू शकेल का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT