OSD of Manish Sisodia arrested while taking bribe  
देश

Power Crisis: "भाजपला सरकार चालवता येत नाहीए"; सिसोदियांचा प्रहार

मोदी सरकारकडून समस्यांवर कारणं शोधली जात आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : दिल्लीवर घोंघावणाऱ्या वीज संकटावरुन उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी रविवारी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर सडकून टीका केली. समस्यांवर केंद्रातील भाजप सरकारला तोडगा काढता येत नाही, त्यामुळे ते यावर वेगळीच कारण शोधत आहेत. यावरुन हेच दिसून येतं की, भाजपला सरकार चालवता येत नाहीए, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

सिसोदिया म्हणाले, "पॉवर प्लान्टमधून आम्हाला आत्ताही सूचना मिळत आहेत की, नक्की कुठे कुठे कोळशाची कमतरता भासत आहे. कुठले प्रकल्प बंद झाले आहेत, असं असतानाही केंद्रीय ऊर्जा मंत्री आर. के. सिंह यांनी आज पत्रकार परिषदेत कोळशाच्या तुटवड्याची शक्यता फेटाळून लावली. तसेच ही अफवा असल्याचे सांगत मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी आम्हाला पत्र लिहिण्याची गरज नव्हती असंही त्यांनी म्हटलं"

भाजपला सरकार चालवता येत नाहीए

सिसोदिया पुढे म्हणाले, "मला त्यांची पत्रकार परिषद पाहून खूपच दुःख झालं कारण केंद्र सरकारने इतकं बेजबाबदार वक्तव्य केलं आहे. ज्यावेळी देशाचे अनेक मुख्यमंत्री केंद्र सरकारला येणाऱ्या संकटापासून जागृत करत आहेत आणि देशाला या संकटातून बाहेर काढा असं म्हणत आहेत. पण यावर मंत्री म्हणतात कोणतही संकट नाही. उलट जो संकटाची माहिती देतोय तर त्याच्यावर टीका करुन तो चुकीचं सांगतोय असंही ते म्हणत आहेत. यावरुन हे स्पष्ट होतं की, भाजप आज अशा स्थितीत आहे की, त्यांना केंद्रातील सरकार चालवता येत नाहीए. ते केवळ समस्येपासून पळण्याची कारणं शोधत आहेत.

ऑक्सिजनच्या तुटवड्यावेळी देखील सरकार होतं डोळे झाकून

भाजपला देश चालवता येत नाहीए. काही दिवसांपूर्वीच जेव्हा देशात ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला होता. तेव्हा राज्यांनी, डॉक्टरांनी सर्वांनी ओरडायला सुरुवात केली की, ऑक्सिजनचा तुटवडा आहे, काही तरी करा? तेव्हा केंद्रानं निर्लज्जपणे म्हणतं होतं की, असं काहीही नाहीए. आपण सर्वांनी पाहिलं की ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळं किती हाहाकार माजला होता. हजारो लोकांना जीव गमवावा लागला. कारण संकटकाळात केंद्र सरकार डोळे बंद करुन बसलं होतं, असंही सिसोदिया यावेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSRTC Officials: एसटीचा तोटा भरून काढा, नाहीतर नोकरी गमवा! प्रताप सरनाईकांचा कामचुकार अधिकाऱ्यांना अल्टिमेटम; ३० दिवसांची मुदत

Pune Civic Row: कात्रज आरोग्य केंद्राच्या दुहेरी उद्‍घाटनावरून भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने, स्थायी समितीत ठराव रखडला

Pune Accident : लुटमार, मदतीचा हात अन् काळाचा घाला! शिरूर बायपासवर महिलेचा दुर्दैवी अंत, एका रात्रीत दोन संकटांचा सामना, काय घडलं..

१ जुलैपासून पेट्रोल-डिझेल खरेदीच्या नियमात बदल, केंद्र सरकारचा मोठा निर्णय...

Dombivli Politics: निवडणुकीत विरोधक, विकासकामात एकत्र; म्हात्रे कुटुंबाच्या व्यासपीठावरील भेटीने डोंबिवलीच्या राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT