Kavita Khanna
Kavita Khanna 
देश

Loksabha 2019 : भाजपने आश्‍वासन पाळले नाही; विनोद खन्नांच्या पत्नीची खंत

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भाजपने गुरुदासपूरमधून उमेदवारी देण्याचे आश्‍वासन पाळले नसल्याची खंत दिवंगत अभिनेते व माजी खासदार विनोद खन्ना यांच्या पत्नी कविता यांनी आज व्यक्त केली. मी नाराज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. भाजपने या जागेवर अभिनेते सनी देओल यांची उमेदवारी जाहीर केली आहे. 

विनोद खन्ना यांच्या निधनानंतर गुरुदासपूरमध्ये भाजपकडून उमेदवारी मिळण्याची अपेक्षा असलेल्या कविता यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. या मतदारसंघातील पोटनिवडणूक कॉंग्रेसने जिंकली होती. गुरुदासपूरमधून उमेदवारी मिळाली नसल्याबद्दल कविता म्हणाल्या, की पक्षातर्फे कोणीही मला प्रचारासाठी येण्यास सांगितले नाही. उमेदवारी अर्ज भरताना पक्षप्रवेशासाठी मला सांगण्यात आले होते, उमेदवारीचेही आश्‍वासन देण्यात आले होते; परंतु झाल्या प्रकारामुळे अतिशय दुःख झाले आहे. हा प्रकार पुन्हा घडू नये, असेही त्या म्हणाल्या.

सनी देओल यांच्यासाठी प्रचार करणार की नाही यावर बोलताना कविता म्हणाल्या, की सनी देओल यांनी प्रचारासाठी विनंती केलेली नाही; मात्र ते जिंकावेत अशी माझी इच्छा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहच्या मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग? चौकशीतून काय समोर आलं?

Vada Pav Girl: ना अटक झाली, ना केस.. मग वडापाव गर्लला का घेऊन गेले दिल्ली पोलीस? व्हायरल व्हिडीओमागचं जाणून घ्या

Viral Video: शिक्षिकेला शाळेत उशिरा येणे पडलं महागात, मुख्याध्यापिकेने केली मारहाण, कपडेही फाडले

Latest Marathi News Live Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी वलसाडमध्ये जाहीर सभेला संबोधित केले

Tesla vs Tesla: ट्रेडमार्कवरून पेटला वाद! टेस्ला भारतीय कंपनीविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT