Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहच्या मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग? चौकशीतून काय समोर आलं?

महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप असलेल्या ब्रिजभूषण सिंह याच्या लहान मुलगा करणभूषण सिंहला भाजपनं लोकसभेची उमेदवारी दिली आहे.
Karan Brij Bhushan Singh Rally
Karan Brij Bhushan Singh Rally

लखनऊ : भारतीय कुस्ती महासंघाचा माजी अध्यक्ष आणि महिला कुस्तीपटूंसोबत लैंगिक शोषण केल्याच्या आरोपांमुळं वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या ब्रिजभूषण शरण सिंह याचा मुलगा करण सिंह याला भाजपनं नुकतेच कैसरगंज लोकसभा मतदारसंघातून तिकीट दिलं आहे.

या करण सिंहच्या ताफ्यामध्ये फायरिंग अर्थात गोळीबार झाल्याचा एक कथित व्हिडिओ व्हायरल झाला होता. पण चौकशीनंतर हा गोळीबार नसून विशिष्ट प्रकारच्या फटाक्यांचा आवाज असल्याचं स्पष्ट झालं आहे. (Firing like video viral in Karan Bhushan Singh Brijbhushan Singh son campaign rally)

Karan Brij Bhushan Singh Rally
Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

करणभूषण सिंहची मतदारसंघातील नवाबगंज, तरबगंज या भागातून बेलसर बाजार भागात रॅली सुरु होती. यावेळी ठिकठिकाणी स्वागत समारंभ आयोजित करण्यात आले होते. दरम्यान, रगडगंज बाजार भागात एकामागून एक बंदुकीच्या फायरिंग प्रमाणं उडणारे फटाके फोडण्यात आले. या प्रकारामुळं काही काळ गोंधळ निर्माण झाला. यानंतर जिल्हा निवडणूक अधिकारी नेहा शर्मा यांनी या संपूर्ण प्रकाराची दखल घेत तात्काळ स्वरुपात चौकशीचे आदेश दिले.

Karan Brij Bhushan Singh Rally
Pune School: स्कॉलरशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं की, पोलीस अधिकाऱ्यांमार्फत या प्रकाराची प्राथमिक चौकशी केली. यामध्ये बंदुकीतून फायरिंग न करता फटाखे फोडल्याचं समोर आलं आहे. निवडणूक आदर्श आचारसंहितेनुसार गर्दीच्या ठिकाणी फटाके फोडणे हे देखील आचारसंहितेचं उल्लंघन असतं. त्यामुळं या अनुषंगानं व्हायरल व्हिडिओची देखील सविस्तर चौकशी केली जात असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. याचा संपूर्ण अहवाल आल्यानंतर संबंधितांवर कारवाई केली जाईल असंही सांगण्यात आलं आहे. (Latest Marathi News)

Karan Brij Bhushan Singh Rally
Pune Illegal Schools: राज्यातील अनधिकृत शाळांवर होणार कारवाई; मोठ्या दंडाची तरतूद

पोलीस अधीक्षक विनित जयस्वाल यांनी सांगितलं की, घटनास्थळी असलेल्या पोलिसांच्या टीमनं माहिती दिली की, हवेत उडणारे फटाके यावेळी फोडण्यात आले. ते फटाके एकामागून एक हवेत फुटत असल्यानं गोळीबाराचा भास निर्माण झाला. पण काळजी करण्याचं काहीही कारण नाही, कारण इथं केवळ फटाकेच फोडण्यात आले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com