BJP has not fielded Union Minorities Minister Mukhtar Abbas Naqvi for Rajya Sabha sakal
देश

अल्पसंख्याक मंत्रालयच इतिहासजमा होणार?

केंद्र सरकारच्या पातळीवर चर्चा सुरू; नक्वींकडे नवी जबाबदारी शक्य

मंगेश वैशंपायन : सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : सत्तारूढ भारतीय जनता पक्षाने राज्यसभेसाठी केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांना उमेदवारी दिलेली नाही. या परिस्थितीत केवळ नक्वीच नव्हे तर अल्पसंख्याक मंत्रालयाचेही भवितव्य धूसर असल्याची माहिती मिळाली आहे. एक तर या मंत्रालयाचे ‘विसर्जन’ करणे किंवा त्याचे स्वरूपच आमूलाग्र बदलणे या दोन पर्यायांवर सध्या सरकार दरबारी मंथन सुरू आहे.

मनमोहनसिंग सरकारच्या काळात २००६ मध्ये जन्माला आलेले हे अल्पसंख्याक कल्याण मंत्रालय आता परिस्थितीनुरूप ‘प्रासंगिक’ उरले आहे का, असा सूर संघपरिवारातून पुन्हा उमटू लागला आहे. नक्वी व त्यांच्यापूर्वी नजमा हेप्तुल्ला यांनी या मंत्रालयाचा कारभार सांभाळला आहे. हेप्तुल्ला यांचीही राज्यसभेतील सहा वेळची कारकीर्द अत्यंत उल्लेखनीय राहिलेली आहे.

नक्वी यांना प्रथम राज्यसभेच्या तिकीट यादीतून वगळण्यात आले व लोकसभेच्या रामपूर पोटनिवडणुकीतही त्यांचे नाव भाजपच्या यादीत नाही. संसदेतही तूर्त भाजपचा एकही मुस्लिम खासदार नसेल. नक्वी यांचा खासदारकीचा कार्यकाळ उद्या (ता.७) संपत आहे. त्यांना सर्वेसर्वा सत्तारूढ नेतृत्व एक मोठी जबाबदारी देऊ इच्छिते अशी दिल्लीच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. देशाच्या दोन सर्वोच्च घटनात्मक पदांची म्हणजे राष्ट्रपती व उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक तोंडावर आली आहे. या दोन पदांपैकी विशेषतः राज्यसभा सांभाळण्याची जबाबदारी असलेल्या उपराष्ट्रपतिपदासाठी नक्वींची वर्णी लागू शकते अशी शक्यता भाजप सूत्रांनी ‘सकाळ’शी बोलताना वर्तविली.

आता आवश्‍यकता नाही?

गुजरातमध्ये २०१७ मध्ये विश्व हिंदू परिषदेची राष्ट्रीय बैठक झाली. तीत अल्पसंख्याक मंत्रालय रद्द करावे अशी जोरदार मागणी समोर आली होती. मनमोहनसिंग सरकारने काँग्रेसच्या धोरणानुसार या मंत्रालयाची स्थापना केली होती. केवळ मुसलमान समाजाला डोळ्यासमोर ठेवून ते स्थापन केले गेले होते व आता त्याची काही आवश्यकता उरलेली नाही असेही काही विहिंप नेत्यांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold-Silver Rate Today: सोन्याचा दर खाली, चांदीतही घसरण! तुमच्या शहरातील ताजे भाव तपासा

Latest Marathi News Updates : उदय सामंतांनी घेतली शरद पवार यांची भेट...

Airtel Recharge : एअरटेलचा पुन्हा धक्का! 'या' रिचार्ज प्लॅनचे दर झाले कमी, पण ग्राहक का नाराज? जाणून घ्या कारण

अरे हा काय टाइमपास लावलाय... तेजश्री- सुबोधच्या नव्या मालिकेवर प्रेक्षक नाराज; म्हणतात- एकही भाग पॉझिटिव्ह...

Kolhapur Flyover Project : कोल्हापुरात दोन उड्डाणपूल होणार, सायबर चौक, संभाजीनगर चौकात उभारणी शक्य, अमल महाडिक यांची माहिती

SCROLL FOR NEXT