BJP holds both Gujarat Rajya Sabha seats; One was vacant due to the demise of Ahmed Patel 
देश

गुजरात राज्यसभेच्या दोन्ही जागा भाजपकडे; अहमद पटेलांच्या निधानामुळे होती एक जागा रिक्त

सकाळ डिजिटल टीम

राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत गुजरातमधील दोन्ही जागा भाजपने जिंकल्याने आहेत त्यामुळे वरिष्ठ सभागृहात भाजपचे बळ ९४ पर्यंत वाढले आहे. विशेष म्हणजे काँग्रेसची निश्चित असलेली जागा अहमद पटेल यांच्या निधनामुळे रिक्त झाली होती. त्यावरही भाजपाने आपला झेंडा रोवला.

गुजरातमधील या दोन्ही जागा जिंकल्याने भाजपा स्पष्ट बहुमतापासून किमान १४ जागांनी दूर आहे. भाजप आघाडी (एनडीए), अण्णा द्रमुक आणि बिजू जनता दलासारख्या मित्रपक्षांचे मिळून येथे स्पष्ट बहुमत झाल्याने नरेंद्र मोदी सरकारची कळीची विधेयके मंजूर करण्यातील आणखी एक अडचण दूर झाली आहे.

भाजपचे दिनशाभाई अननवाडिया आणि रामभाई मोकारिया यांची गुजरातमधून राज्यसभेवर आज निवड झाली. संख्याबळाच्या बाबतीत राज्यसभेत दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस असून त्यांचे ३६ सदस्य आहेत. हे बळ ‘एनडीए’च्या तुलनेत एक तृतीयांशच आहे. राज्यसभेतील हा मुख्य विरोधी पक्ष दिवंगत ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांची जागाही वाचवू शकला नाही. त्यांची मुदत २०२३ पर्यंत होती. 

पटेल व भाजपचे अभय भारद्वाज यांच्या निधनामुळे या दोन्ही जागा रिक्त झाल्या होत्या. गुजरातच्या १८२ सदस्यांच्या विधानसभेत भाजपचे १०३ व काँग्रेसचे ६५ आमदार आहेत. त्यामुळे भाजपच्या विजयात भारतीय आदिवासी पक्षाचे दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका आमदारासह अपक्ष जिग्नेश मेवानी यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे स्पष्ट आहे. काँग्रेसला पुदुच्चेरीतील सत्ता गमवावी लागण्याच्या दिवशीच गुजरातमधून दुसरा झटका बसला.

राज्यसभेतील प्रमुख पक्षांचे बलाबल

भाजप : ९४
काँग्रेस : ३६
तृणमूल काँग्रेस : १२
बिजू जनत दल व अण्णाद्रमुक : प्रत्येकी ९
द्रमुक व टीआरएस : प्रत्येकी ७
वायएसआर काँग्रेस व डावे पक्ष : प्रत्येकी ६
जेडीयू, सप व राजद : प्रत्येकी ५
राष्ट्रवादी काँग्रेस :
राष्ट्रपतीनियुक्त : १२ (पैकी ८ सदस्यांनी भाजपचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारले आहे)
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SL vs AUS, T20 WC: आराsssssरा खतरनाक! ग्लेन मॅक्सवेलचा रिव्हर्स स्विप अन् पथूम निसंकाचा चपळ झेल; सर्वोत्कृष्ट कॅच Video

Faridabad Factory Fire : 'केमिकल ड्रम्स'चे स्फोट झाल्याने फॅक्टरीत भीषण अग्नितांडव!, दोन पोलिसांसह ३५ जण होरपळले

Latest Marathi News Update : भाजपला उघडे पडणारच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा

ILS Law College Fee Case : शुल्क परताव्याबाबत राज्य सरकारने दोन महिन्यांत निर्णय घ्यावा; मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश

Sahar Shaikh Video: ओवैसी बंधूंसमोरच सहर शेख यांची १५ मिनिटांची भाषा; व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT