BJP leader DV Sadananda Gowda esakal
देश

BJP Politics : भाजपनं 'या' पक्षासोबत केली युती; नाराज झालेल्या माजी केंद्रीय मंत्र्यानं राजकारणातून घेतली तडकाफडकी निवृत्ती

माझ्या ३० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत पक्षाने आपल्याला सर्व काही दिले आहे.

सकाळ डिजिटल टीम

पुढील लोकसभा निवडणुकीत भाजप त्यांना तिकीट देणार नसल्याची चर्चा सुरु होती. त्यामुळे ते नाराज असून पक्षश्रेष्ठींनी आपली भूमिका मांडावी, अशी मागणी त्यांनी केली.

बंगळूर : भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री तसेच माजी केंद्रीय मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा (D. V. Sadananda Gowda) यांनी बुधवारी निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली. भाजपने धजदशी केलेल्या युतीवर ते नाराज होते.

हासनमध्ये दुष्काळग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर सदानंद गौडा यांनी निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली. आपणास पक्षाने भरपूर दिले आहे, आता त्यापेक्षा जास्त इच्छा नसल्याचे ते म्हणाले.

ते म्हणाले, ‘‘सध्या मी बंगळूर उत्तर लोकसभा मतदारसंघाचे ते प्रतिनिधित्व करतो. माझ्या ३० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत पक्षाने आपल्याला सर्व काही दिले आहे. दहा वर्षे आमदार, २० वर्षे खासदार, एक वर्ष मुख्यमंत्री, चार वर्षे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि सात वर्षे कॅबिनेट मंत्री म्हणून काम केले आहे. आपल्याला आणखी काही हवे असेल तर लोक आपल्याला स्वार्थी म्हणतील.’’

२०२१ मध्ये केंद्रीय मंत्रीमंडळाच्या फेरबदलादरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानुसार मंत्रीपदाचा राजीनामा दिला. पुढील लोकसभा निवडणुकीत भाजप त्यांना तिकीट देणार नसल्याची चर्चा सुरु होती. त्यामुळे ते नाराज असून पक्षश्रेष्ठींनी आपली भूमिका मांडावी, अशी मागणी त्यांनी केली.

राज्यातील नेते आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या नियुक्तीला झालेल्या विलंबावर भाष्य करताना ते म्हणाले की, ते लाजिरवाणे आहे. आम्ही विलंब स्वीकारतो. आमच्या नेत्यांनी या विषयावर वैयक्तिक मते गोळा केली आहेत आणि पाच राज्यांच्या निवडणुका संपल्यानंतर घोषणा केली जाण्याची आम्हाला अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

आजचे राशिभविष्य - 17 मे 2026

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 16 मे 2026

New Marathi Books Review : वाचनीय आणि संग्रहणीय! अध्यात्मापासून ते पर्यटनाच्या अनुभूतीपर्यंत, नव्या पुस्तकांची रंजक सफर

साप्ताहिक राशिभविष्य : (१७ मे २०२६ ते २३ मे २०२६)

SCROLL FOR NEXT