नवी दिल्ली - केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचे मन वळविण्यासाठी सत्तारूढ भाजप मैदानात उतरला आहे. भाजपच्या वतीने मोदी सरकारच्या या कायद्यांमुळे शेतकऱ्यांना, विशेषतः छोट्या शेतकऱ्यांना होणारे मोठे फायदे समजावून सांगण्यासाठी देशभरात भाजप नेते ७०० पत्रकार परिषदा घेतील तसेच ७०० चावडीवरील बैठकांमध्ये ते सहभागी होणार आहेत.
भाजप नेत्यांच्या म्हणण्यानुसार पंजाब, हरियाना ही संपन्न राज्ये व विरोधकांची सत्ता असलेल्या राज्यांचा काही भाग वगळता देशात कोठेही आंदोलने सुरू नाहीत. देशभरातील शेतकरी या कायद्यांबद्दल नाराज नाही. मात्र यानिमित्ताने तीनही कायद्यांबद्दल जनजागृती करण्याचा भाग म्हणून केंद्रीय मंत्री, भाजपचे खासदार, आमदार देशभरात फिरून ७०० पत्रकार परिषदा घेतील. त्यांच्याबरोबरच भाजप नेतेही चावडी बैठका घेऊन शेतकऱ्यांना तिन्ही कृषी कायद्यांचे फायदे समजावून सांगतील.
चावडी बाजार !
देशाच्या ग्रामीण भागात आजही चावडी व्यवस्था प्रचलित आहे. चौपाल, चौवाडी, चव्हाटी, चावरी हेही शब्द यासाठी वापरले जातात. गावातील तंटे सोडविण्यासाठी किंवा मन मोकळे करण्यासाठी ग्रामस्थ एकत्र येऊन चावडीवर गप्पा मारतात, चर्चा करतात. याला पंचायत बैठका, ग्रामसभा असेही म्हटले जाते. ग्रामीण भागात बाजारातील पोलिस चौकीलाही चावडी म्हटले जाते." चावडीवर दरवडा' ही म्हणही त्यातून प्रचलित झाली आहे. जुन्या दिल्लीतही महादजी शिंदे यांची चावडी भरत असे तो भाग चावडी बाजार नावाने आजही प्रसिद्ध असून मेट्रोचे त्याच नावाचे स्थानकही येथे आहे.
देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
किसान युनियनची न्यायालयात याचिका
केंद्राच्या कृषी कायद्यांवरून दिल्लीमध्ये आंदोलनाचा भडका उडाला असताना भारतीय किसान युनियनने हे कायदेच रद्द करावेत, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर केली आहे. या संघटनेचे अध्यक्ष भानूप्रतापसिंग यांनी ही याचिका दाखल केली आहे. या तिन्ही कायद्यांमुळे भारतीय शेतीचे व्यापारीकरण होणार असून त्यामुळे शेतकऱ्यांना भवितव्यामध्ये कॉर्पोरेटच्या मर्जीनुसार वागावे लागेल, अशी भीती त्यांनी याचिकेमध्ये व्यक्त केली आहे. केंद्राने कृषी कायदे संसदेमध्ये मंजूर करण्यापूर्वी त्यावर पुरेशी चर्चा देखील केली नव्हती, असा आरोपही त्यांनी केला आहे.
जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.