Gautam Gambhir and Arvind Kejariwal 
देश

Gautam Gambhir : "गुनाह करके कहां जाओगे गालिब..."; सिसोदियांच्या अटकेनंतर गौतम गंभीर यांचा टोला

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्लीः दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना मद्य घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. सीबीआयने ही कारवाई केली आहे. यावर आता आम आदमी पक्षाकडून प्रतिक्रिया आली आहे. त्याला भाजप खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांनी प्रत्युत्तर दिलं.

भारतीय जनता पक्षाचे खासदार गौतम गंभीर यांनी सिसोदिया यांच्या अटकेवर ट्विट केले आहे. गौतम गंभीरने लिहिलंय की, "गुनाह करके कहां जाओगे गालिब, ये ज़मीं ये आसमां सब “AAP” ही का तो है !

आपचे आमदार सौरभ भारद्वाज म्हणाले, "सीबीआय पूर्णपणे केंद्राच्या इशाऱ्यावर काम करत आहे. मनीष सिसोदिया यांना अटक होणार हे आम्हाला आधीच माहीत होते. तसेच तपास यंत्रणा कशा प्रकारे काम करतात हे दुःखद आणि अंदाज लावण्यासारखे आहे.

केंद्राकडून सीबीआयचा गैरवापर होत असल्याचा 'आप'चा दावा भाजपचे मनजिंदर सिंग सिरसा यांनी फेटाळून लावला. सिसोदिया यांच्या शिक्षण आणि अर्थ खात्याचा संदर्भ देत सिरसा यांनी सांगितले की, "त्यांनी शिक्षणावर काम केले असेल, परंतु याचा अर्थ असा नाही की त्यांनी मद्यधोरणात भ्रष्टाचार करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT