danish ali pm modi 
देश

PM Modi: पंतप्रधान मोदींना 'नीच' म्हणाले, म्हणून त्यांनी...; भाजप खासदाराची सभापतींकडे लेखी तक्रार

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- भाजप खासदार रमेश बिधुरी यांनी बसपा खासदार दानिश अली यांच्याबाबत असंसदीय शब्दांचा वापर केला होता. यावरुन देशात मोठा गदारोळ निर्माण झालाय. रमेश बिधुरी यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. दुसरीकडे भाजपकडून दानिश अली यांच्या विरोधात मोर्चा उघडण्यात आला आहे. भाजप खासदार हरनाथ सिंग यादव यांनी यासंदर्भात लोकसभेचे सभापती ओम प्रकाश बिर्ला यांना पत्र लिहिलं आहे.

लोकसभेमध्ये बोलताना रमेश बिधुरी जे काही बोलले त्याचं समर्थन होऊ शकत नाही. पण, दानिश अली यांनीही संसदेत पंतप्रधान मोदींचा अपमान केला आहे. त्यांनी पंतप्रधान मोदी यांचा नीच असा उल्लेख केला. त्यामुळे नाराज झालेल्या रमेश बिधुरी यांनी दानिश अली यांच्याबाबत अपशब्द वापरले. पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात विरोधक अनेकदा अपशब्द बोलत असतात, असं ते पत्रात म्हणाले आहेत.

पंतप्रधान मोदी यांचा आदर सर्व जग आणि भारत करते. त्यामुळे संसदेतील खासदारानेही त्यांना आदर करावा अशी अपेक्षा असते. विरोधक याप्रकरणाला राजकीय रंग देत आहेत, हे दुर्दैवी आहे. कोणत्याही विरोधकाने दानिश अली यांच्या कृतीचा निषेध व्यक्त केला नाही. उलट नफरत की दुकान म्हणत त्यांना अधिक उत्तेजन दिले जात आहे, असं म्हणत त्यांनी राहुल गांधी यांच्यावरही टीका केलीये.

संसद हे एक पवित्र मंदिर आहे. संविधान लोकशाहीचा आत्मा आहे आणि खासदार लोकशाहीचे रक्षक आहेत. पण, त्यांच्याकडूनच संसदेची प्रतिष्ठा जपली जात नाहीये. पंतप्रधान मोदी यांना सभागृहात नीच म्हणण्यात आलं, त्यामुळे माझा संताप झाला आहे. सभापतींनी या प्रकरणात लक्ष द्यावं. जेणेकरुन सत्य बाहेर येईल, असं हरनाथ सिंग यादव म्हणालेत. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT