BJP MP Hema Malini on record 141 Opposition MPs suspension winter session of Parliament Marathi news  
देश

Record MPs Suspended : 'खूप प्रश्न विचारतात म्हणून...'; १४१ खासदारांचं निलंबनावर हेमा मालिनी बोलल्या

लोकसभा आणि राज्यसभेतून निलंबित करण्यात आलेल्या खासदारांची संख्या 141 झाली आहे.

रोहित कणसे

संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान राज्यसभा आणि लोकसभेतून विरोधी पक्षातील तब्बल 141 खासदारांना निलंबीत करण्यात आलं आहे. यादरम्यान भाजपच्या खासदार आणि ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांनी मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी (विरोधी खासदारांनी) खूप प्रश्न विचारले आणि ते विचित्र वागले म्हणूनच त्यांना निलंबित करण्यात आल्याचे म्हटले आहे.

त्यांनी काहीतरी चूक केली असेल म्हणूनच त्यांना निलंबित करण्यात आलं आहे. प्रत्येकाने संसदेत घालून दिलेल्या नियमांनुसार वर्तन केलं पाहीजे. त्यांनी तसं केलं नाही म्हणून ते निलंबित झाले, यामध्ये काही चुकीचं नाही ते योग्यच आहे.

इंडीया आघाडीच्या बैठकीबद्दल विचारले असता त्या म्हणाल्या की, विरोधकांचा उद्देश हाच आहे की संसदेचं काम चालू द्यायचं नाही आणि मोदी सरकार उपटून टाकायचं आहे, पण ते यशस्वी होणार नाहीत. असेही हेमा मालिनी म्हणाल्या.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मंगळवारी 49 खासदारांना लोकसभेतून निलंबित करण्यात आले. त्यामुळे लोकसभा आणि राज्यसभेतून निलंबित करण्यात आलेल्या खासदारांची संख्या 141 झाली आहे. एक दिवस आधी सोमवारी 78 खासदारांना निलंबित करण्यात आले, हा एक विक्रम आहे. पहिल्यांदाच एवढ्या खासदारांचे निलंबन झाले आहे.

दरम्यान एकाच वेळी इतक्या विरोधी खासदारांच्या निलंबनाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या बैठकीपूर्वी काँग्रेससह सर्व पक्षांनी ही लोकशाहीची हत्या असल्याचे म्हटले होते. विरोधकांकडून निलंबनाची कारवाई म्हणजे लोकशाहीची हत्या असल्याचे म्हटले जात आहे, मात्र भाजप खासदार कारवाई योग्यच असल्याचे सांगत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT