pune  sakal
देश

आरोपांत सत्य म्हणूनच सत्ताधारी गप्प : राऊत

पेगॅसस प्रकरणी विरोधकांच्या आरोपात‌ तथ्य आहे. म्हणूनच सत्ताधारी शांत असून, त्यावर चर्चा होऊ देत नाहीत,‌ अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज केली.

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पेगॅसस प्रकरणी विरोधकांच्या आरोपात‌ तथ्य आहे. म्हणूनच सत्ताधारी शांत असून, त्यावर चर्चा होऊ देत नाहीत,‌ अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी आज केली. संसदेचे पावसाळी अधिवेशन (Parliament session) सुरू आहे. मात्र पेगॅसस (pegasas spywear) आणि शेतकरी आंदोलन (farmers Movement) या मुद्द्यांवरून दोन्ही सभागृहाचे कामकाज स्थगित होत आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘सकाळ’ने राऊत यांच्याशी त्यांच्या निवासस्थानी संवाद‌ साधला. याआधी राऊत यांनी राहुल गांधी याांची सोमवारी भेट घेत चर्चा केली होती. (bjp silent on allegations)

ते म्हणाले, ‘‘सत्ताधारी ऐकत नसतील, तर सभागृहाचे कामकाज चालू न देणे हा विरोधकांचा अधिकार आहे. पेगॅसस प्रकरणावर विरोधक चर्चेची मागणी करीत असतील, तर तिचा गांभीर्याने विचार झाला पाहिजे. सभागृहाचे कामकाज आज बंद पडत नाहीये. टू जी प्रकरणात भाजपनेच अनेक दिवस सभागृहाचे कामकाज बंद पाडले होते. आम्हीही त्यावेळी त्यांच्याबरोबर होतो.’’ पेगॅससचे‌ सत्य काय, याप्रश्नावर राऊत म्हणाले, ‘‘विरोधकांच्या आरोपात तथ्य आहे. त्यामुळेच सरकार या प्रकरणी शांत आहे आणि चर्चाही होऊ दिली जात नाही.

त्यामुळे विरोधक संसदेत आवाज उठविण्याचा प्रयत्न करीत आहेत.’’ सध्या विरोधक सरकारच्या विरोधात एकत्र येऊ लागल्याचे चित्र आहे, त्याबाबत राऊत म्हणाले, ‘‘राहुल गांधी पुढाकार घेऊन विरोधकांना एकत्र आणत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारला विरोधकांच्या मागण्यांची दखल घ्यावीच लागेल.’’

तो अधिकार पटोलेंना नाही

महाराष्ट्रात आगामी काळात महापालिका निवडणुका आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे स्वबळावर लढण्याची भाषा करीत आहेत. यावर विचारले असता राऊत म्हणाले, ‘‘निवडणुकीतील आघाडीबाबत‌ तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल. तो अधिकार पटोले यांना नाही,’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: धक्कादायक ! ६७ वर्षांच्या प्रियकराने ३० वर्षांच्या प्रेयसीची केली हत्या, ३ वर्षांचा मुलगा गंभीर जखमी

Online Gaming Bill 2025: Asia Cup पूर्वीच ड्रीम 11ची माघार; बीसीसीआयला किती कोटींचे नुकसान होणार?

Satara News:'मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला फलटणकरांचा पाठिंबा'; पुन्हा सरकारविरुद्ध आक्रमक भूमिका

Mercury Transit 2025: बुध ग्रहाचा मघा नक्षत्रात गोचर; जाणून घ्या कोणत्या राशींना होईल धनलाभ!

Nasik Police : ‘डायल ११२’ वर कॉल करा आणि ४ मिनिटांत पोलिसांना बोलवा! नाशिक पोलिसांचा ‘रिस्पॉन्स टाइम’ देशात सर्वोत्कृष्ट

SCROLL FOR NEXT