Rahul Gandhi
Rahul Gandhi Sakal
देश

काँग्रेस नेते 1984 पासून...; राहुल गांधींच्या विधानावर भाजपचा पलटवार

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : लंडनमधील केंब्रिज विद्यापीठात आयडियाज ऑफ इंडिया परिषदेतील काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशभरात रॉकेल आहे आणि त्यासाठी फक्त एक ठिणगी हवी आहे, असे म्हटले होते. त्यांच्या या विधानावर भाजपनेदेखील जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. यात काँग्रेसचे नेते 1984 पासून रॉकेल सोबत घेऊन फिरत असल्याचे उत्तर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया यांनी दिले आहे. राहुल गांधी हे सवयीचे गुन्हेगार असून, जे त्यांच्या आधीच्या चुकीपेक्षा मोठी चूक करतात असेही भाटीया म्हणाले. या चर्चासत्राचे नाव 'आयडियाज टू डिस्ट्रॉय इंडिया'' असे असायला हवे होते. कारण ही काँग्रेस पक्षाची मानसिकता आहे असे भाटिया म्हणाले.

भाटीया म्हणाले की, राहुल गांधींनी या कार्यक्रमात मोदींच्या काळात भारताची तुलना पाकिस्तानशी केली. मात्र, ते जेव्हा परदेशात जातात तेव्हा भारताचे नकारात्मक चित्र मांडत असतात. भारताची तुलना दहशतवादाशी करणे हा मोठा गुन्हा आहे. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांच्या कथित ट्विटवरून झालेल्या वादाचा संदर्भ दिला.

लडाखमध्ये युक्रेनसारखी परिस्थिती

रशिया-युक्रेन संकटाबाबत बोलताना राहुल गांधी सेमिनारमध्ये म्हणाले की, "युक्रेनसारखी परिस्थिती भारतातही आहे. युक्रेनमध्ये काय चालले आहे आणि लडाखमध्ये काय चालले आहे? तुम्हाला दोन्हीमध्ये समांतरता दिसेल." राहुल गांधींच्या या विधानावर खिल्ली उडवताना भाटीया म्हणाले की, "राहुल गांधींची राजकारणातील स्थिती एखाद्या व्यक्तीसारखी आहे ज्याला पीएचडी परीक्षेला बसायचे आहे, परंतु त्यांना पुस्तके आवडत नाहीत आणि त्यांनी नर्सरी देखील पास केलेली नाही."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shashikant Shinde: मार्केट FSI घोटाळा प्रकरणी शशिकांत शिंदेंवर गुन्हा दाखल; निवडणुकीच्या तोंडावर कारवाईची शक्यता

Latest Marathi News Live Update: मुंबई उत्तर मध्यमधून भाजपकडून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी

Hemant Soren : हेमंत सोरेन यांना धक्का! ईडी कोर्टाने फेटाळला जामीन अर्ज; काय आहे प्रकरण?

Lok Sabha Election : ....म्हणून श्रीकांत शिंदेंना लोकसभेत पाठवणे गरजेचे; रामदास आठवलेंचे उल्हासनगरात आवाहन

IPL 2024 DC vs MI Live Score : बुमराहने ऋषभ पंतला धाडलं माघारी; दिल्ली पार करणार अडीचशे धावांचा टप्पा?

SCROLL FOR NEXT