basavaraj bommai
basavaraj bommai sakal
देश

कर्नाटकात भाजप केमोथेरपी करण्याची चिन्हे

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणूक जेमतेम एका वर्षावर आलेली असताना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने बसवराज बोम्मई मंत्रिमंडळात मोठे फएरबदल करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मुख्यमंत्री बोम्मई यांना आज तातडीने दिल्लीत बोलावून घेण्यात आले. त्याचबरोबर कर्नाटकातील अनेक मंत्र्यांनीही खुर्ची वाचविण्यासाठी दिल्लीत धाव घेतली आहे.

हिजाब पाठोपाठ मशिदींवरील लाऊडस्पीकरचा मुद्दा कर्नाटकातही तापला आहे. मुख्यमंत्री बोम्मई यांनी लाऊडस्पीकर्समुळे ध्वनीप्रदूषण व इतरांना त्रास होतो असा सूर लावला आहे. पुढील वर्षी विधानसभा निवडणुका असल्याने भाजपचा प्रचार कोणत्या ॉ्ंगाने जाणार याची ही स्पष्ट झलक आहे. त्याच वेळी राज्यातील राजकीय हालचालींनाही गतीशक्ती आली असून बोम्मई मंत्रिमंडळात नजिकच्या काळात मोठ्या फेरबदलांची चिन्हे आहेत.

भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने राज्यातील वजनदार नेते बी एस येदियुरप्पा यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार करण्याची अवघड वाटणारी शस्त्रक्रिया केली व बोम्मई यांना मुख्यमंत्रीपदी नियुक्त केले. मात्र कर्नाटकातील भाजप सरकारची कामगिरी व आगामी निवडणुका लक्षात घेता टीम बोम्मई मध्येही मोठे फएरबदल करण्याची गरज केंद्रीय नेतृत्वाला भासत आहे. त्यामुळेच बोम्मई व प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील यांना तातडीने दिल्लीत बोलावून घेण्यात आले आहे. कर्नाटकात भाजप प्रदेशाध्यक्षही बदलण्याच्या विचारात आहे. तसे झाल्यास पाटील हे बोम्मई मंत्रिमंडळात जातील व त्यांच्या जागी एखादा कडवा हिंदुत्ववादी चेहरा येईल अशा हालचाली आहे.

एप्रिल २०२३ मध्ये कर्नाटकात विधानसभा निवडणुका आहेत. मात्र भाजप नेतृत्व कोणतीही रिस्क घेऊ इच्छित नाही. त्यामुळेच राज्य सरकारमधील ज्या मंत्र्यांची कामगिरी चांगली नसल्याचे फीडबॅक आहेत त्यांना नारळ देण्याची तयारी पक्षनेतृत्वाने केली आहे. बोम्मई यांना गृहमंत्री अमित शहा व भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांना भेटण्यास सांगण्यात आले आहे. या दोघांचीही वेळ आपण मागितली असून ती अद्याप मिळालेली नाही असे मुख्यमंत्र्यांनी बंगळुरूतून दिल्लीला येण्यापूर्वी सांगितले. दिल्लीतील तीन महापालिका बरखास्त करण्याचे वादगर्सत विधेयक राज्यसभेत आज चर्चेला आले असल्यने शहा वरिष्ठ सभागृहात आहेत. त्यामुळे ते आज रात्री उशीरा बोम्मई व पाटील यांच्याशी चर्चा करतील असे समजते. याच दरम्यान कर्नाटकातील अनेक

मंत्र्यांनीही खुर्ची जाण्याच्या भीतीने दिल्ली गाठली आहे. यापुर्वी 2008 पासून जेंव्हा जेंव्हा येदियुरप्पा यांना मुख्यमंत्रिपद सोडण्यास दिल्लीतून सांगण्यात आले त्यावेळी त्यांनी मंत्री व आमदारांचा जथा घेऊन दिल्लीवर दबाव टाकला होता. यावेळी मात्र त्यांच्या गटातील मंत्री स्वतःचेच पद वाचविण्यासाठी दिल्लीत आले आहेत. सर्वच मंत्र्यांना शहा व नड्डा यांची भेट मिळणे शक्य नसली तरी दिल्लीत पक्षाचे खासदार व अन्य नेत्यांच्या गाठीभेटी घेण्याचा सपाटा या साऱयांनी लावला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकसभेचा महाराष्ट्ररंग

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 05 मे 2024

IPL 2024 RCB vs GT: जोशुआ लिटिलनं दिलेलं टेंशन, पण बेंगळुरूने विजयाचा चौकार मारत प्लेऑफच्या आशाही ठेवल्या जिंवत

कहाणी वेदनादायी आयुष्याची

दलितांच्या जीवनाचं वास्तव चित्रण

SCROLL FOR NEXT