BJP wins 
देश

BJP wins Arunachal Pradesh: लोकसभा निकालापूर्वी भाजपला अच्छे दिन! अरुणाचलमध्ये मिळाली एकहाती सत्ता

Arunachal Pradesh Assembly Elections: अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने विजय मिळवला आहे. भाजप चीनला लागून असलेल्या राज्यात मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं दिसत आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने विजय मिळवला आहे. ६० जागा असलेल्या या राज्यात भाजपने आतापर्यंत ३८ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे भाजपने बहुमत गाठल्याचं स्पष्ट आहे. याशिवाय ७ जागांवर भाजप आघाडीवर आहे. त्यामुळे भाजप चीनला लागून असलेल्या राज्यात मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं दिसत आहे.

अरुणाचल प्रदेशमध्ये भाजप पुन्हा एकदा सत्ता कायम राखण्यात यशस्वी झाली आहे. याशिवाय भाजपचा दणदणीत विजय झालाय असंच म्हणावं लागेल. सध्याच्या निकालानुसार भाजपने ३८ जागा जिंकल्या आहेत, तर ७ जागांवर भाजप आघाडीवर आहे. दुसरीकडे सिक्किममध्ये एसकेएम पक्षाने मोठा विजय मिळवला आहे.

अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपचे १० उमेदवार निवडणुकीपूर्वीच बिनविरोध निवडून आले होते. त्यामुळे याठिकाणची लढत भाजपसाठी सोपी होती. प्रदेशमध्ये ५० जागांसाठी मतमोजणी सुरु होती. भाजपचे ३८ उमेदवार विजयी घोषित करण्यात आले आहेत. सात जणांनी आघाडी घेतली आहे. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी विजयाबाबत सर्वांचे अभिनंदन केले आहे.

नॅशनल पीपल्स पार्टीने (NPEP) दोन जागा जिंकल्या आहेत, कर तीन जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) तीन जागांवर आघाडीवर आहे. पीपल्स पार्टी अरुणाचल प्रदेशने (PPA) दोन जागा जिंकल्या आहेत. याशिवाय अपक्ष उमेदवार वांग्लम सविन यांनी खोनसा येथून विजय मिळवलाय. तसेच दोन अपक्ष उमेदवार आघाडीवर आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT