इंधनावरील व्हॅट पश्चिम बंगाल सरकारने कमी करावा म्हणून मोर्चा काढलेल्या भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन वाहनात बसण्यास भाग पाडले. त्यानंतरही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी कायम ठेवली sakal
देश

पेट्रोल दरावरून भाजपचे बंगालमध्ये आंदोलन

व्हॅट कमी करण्याची सत्ताधारी तृणमूलकडे मागणी

सकाळ वृत्तसेवा

कोलकता : पश्चिम बंगाल सरकारने इंधनावरील मूल्यवर्धित कर (व्हॅट) कमी करावा या मागणीसाठी भाजपने सोमवारपासून पाच दिवसांचे आंदोलन छेडले.

प्रदेशाध्यक्ष राजू बॅनर्जी यांनी सांगितले की, प्रदेशाध्यक्ष सुकांत मजुमदार, विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी, राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप घोष आणि इतर वरिष्ठ नेत्यांचा आंदोलनात सहभाग असेल. कोविड नियमावलीचे पालन करू आम्ही मोर्चात भाग घेऊ. पोलिसांनी आम्हाला रोखण्याचा प्रयत्न केल्यास परिस्थितीनुसार वागू. कोलकत्यातून प्रारंभ झाल्यानंतर राज्याच्या विविध विभागांत ९ ते १२ नोव्हेंबर दरम्यान मोर्चे काढले जातील. हा विषय फार तातडीचा असल्यामुळे छट पूजा आणि जगद्धात्री पूजा होईपर्यंत प्रतिक्षा पाहणे शक्य नाही.

केंद्राने पेट्रोल पाच, तर डिझेल दहा रुपयांनी स्वस्त केले. या निर्णयाची अंमलबजावणी भाजप व मित्र पक्षांची सत्ता असलेल्या २२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी केली. विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांनी मात्र तेवढ्या तातडीने कार्यवाही केलेली नाही.

ममता आता मात्र गप्प...

भाजप प्रदेश उपाध्यक्ष राजू बॅनर्जी यांनी सांगितले की, इंधन दरवाढीवरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जोरदार टीका केली होती. केंद्र सरकारने दिवाळीच्या पुर्वसंध्येस अबकारी कर माफ केल्यानंतर मात्र त्या आणि त्यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष गप्प आहे. ममता जर गरिबांच्या इतक्या कैवारी असतील तर आसाम आणि उत्तर प्रदेश या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांप्रमाणे त्या व्हॅटबाबतच्या निर्णयाचे अनुकरण का करीत नाहीत. अर्थात गरिबांना दिलासा मिळेल असा निर्णय त्या घेणार नाहीत. याचे कारण अशा करांमधून जमा होणारी रक्कम मेळाव्यांचे आयोजन आणि क्लबना देणग्या देण्यासाठी वापरली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT